Delhi Encounter Saam Tv
देश विदेश

Delhi Encounter: दिल्लीमध्ये मध्यरात्री मोठी चकमक, बिहारच्या ४ गँगस्टर्सचा पोलिसांकडून एन्काऊंटर

Delhi Police: दिल्लीच्या रोहिणीनगरमध्ये मध्यरात्री मोठी चकमक झाली. या चकमकीत ४ गँगस्टर्सचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले. हे चौघेही बिहार विधानसभा निवडणुकीत दहशत माजवण्याचा प्रयत् करत होते.

Priya More

Summary -

  • दिल्लीतील रोहिणी नगरमध्ये मध्यरात्री मोठी चकमक झाली

  • बिहारच्या सिग्मा गँगचे ४ कुख्यात गँगस्टर्सचा खात्मा करण्यात पोलिसांना यश

  • दिल्ली पोलिस आणि बिहार पोलिसांची संयुक्त कारवाई

  • गँगस्टर्स बिहार निवडणुकीपूर्वी दहशत माजवण्याचा कट रचत होते

दिल्लीच्या रोहिणीनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास मोठी चकमक झाली. ज्यामध्ये बिहारच्या मोस्ट वॉन्टेड सिग्मा गँगच्या ४ कुख्यात गँगस्टरचा खात्मा करण्यात आला. ही कारवाई दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँच आणि बिहार पोलिसांनी एकत्रित केली. गोळीबाराच्या आवाजाने रोहणीनगर हादरून गेले आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. ठार करण्यात आलेले गँगस्टर विधानसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये दहशत निर्माण करण्याचा कट रचत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री २:२० वाजताच्या सुमारास ही चकमक झाली. डॉक्टर आंबेडकर चौक ते पानसाळी चौक या बहादूर शाह मार्गावर ही चकमक झाली. पोलिस आणि गुन्हेगारांमध्ये जोरदार गोळीबार झाला. ज्यामध्ये चार जण जखमी झाले. नंतर चौघांनाही उपचारासाठी रोहिणी येथील डॉ. बीएसए रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

चकमकीत ठार झालेल्यांमध्ये रंजन पाठक (25 वर्षे), बिमलेश महातो उर्फ ​​बिमलेश साहनी (25 वर्षे), मनीष पाठक (33 वर्षे) आणि अमन ठाकूर (21 वर्षे) यांचा समावेश आहे. रंजन, बिमलेश आणि मनीष हे तिघेही बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील रहिवासी होते. तर अमन ठाकूर हा दिल्लीतील करावल नगरमधील शेरपूर गावचा रहिवासी होता.

दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि बिहार पोलिसांनी दिल्लीत एक मोठी संयुक्त कारवाई केली. या चकमकीत बिहारमधील तीन गुन्हेगार आणि त्यांचा एक साथीदार ठार झाला. हे सर्वजण सिग्मा गँगचे गँगस्टर होते. चकमकीत ठार झालेला रंजन पाठक हा सिग्मा गँगचा म्होरक्या होता. या गँगस्टर्सनी अनेक गुन्हे करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates: २४३ जागांचे कल हातात, कोणता पक्ष आघाडीवर?

EPF Transfer Rules: नोकरी बदलल्यानंतर PF होणार ऑटोमॅटिक ट्रान्सफर; सिंपल प्रोसेस वाचा

Mumbai : धार्मिक विधीच्या नावाने हॉटेलमध्ये नेलं अन् बलात्कार केला, व्हिडिओ काढून सुरू केला ब्लॅकमेलिंगचा खेळ

Maharashtra Live News Update: नवले ब्रीज अपघात प्रकरणी गुन्हा दाखल, तिघांवर गुन्हा दाखल

Bihar Election Result: सुरुवातीचे कल एनडीएच्या बाजूने, बहुमताचा जादुई आकडा ओलांडला, कुणाला किती जागांवर आघाडी?

SCROLL FOR NEXT