Palghar Tourism : मुंबईजवळील फार कमी लोकांना माहित असलेले ऐतिहासिक ठिकाण , 'येथे' मराठ्यांनी घडवलाय इतिहास

Shreya Maskar

पालघर

पालघर जिल्ह्यातील बोईसरजवळील तारापूर किल्ला हा एक प्राचीन, ऐतिहासिक आणि पोर्तुगीजकालीन सागरी किल्ला आहे. हा एक प्रसिद्ध ऐतिहासिक किनारी किल्ला आहे.

Palghar | google

कोण बांधला?

१६ व्या शतकात बांधलेला तारापूर किल्ला चिमाजी अप्पांनी १७३९ मध्ये जिंकला होता. हा ऐतिहासिक वारसा, बालेकिल्ला, जुने चर्च आणि उत्तम पाण्याच्या विहिरींसाठी प्रसिद्ध आहे.

Tarapur Fort | google

पर्यटन स्थळ

तारापूर किल्ल्याजवळ नयनरम्य असा चिंचणी समुद्रकिनारा आहे. येथून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. पर्यटक येथे वीकेंडला आवर्जून येतात.

Tarapur Fort | google

सप्तकोनी

तारापूर किल्ला सप्तकोनी आकाराचा असून त्याला ४ बुरुज होते. किल्ल्यात गोड्या पाण्याची विहीर आहे. तुम्ही येथे सुट्टीत नक्की भेट द्या.

Tarapur Fort | google

कसं जाल?

बोईसर स्टेशनला उतरून तुम्ही सहज रिक्षाने तारापूर किल्ल्यापर्यंत जाऊ शकता. वन डे पिकनिकसाठी हे उत्तम लोकेशन आहे. येथे नक्की लहान मुलांसोबत या आणि त्यांना इतिहासाची आठवण करून द्या.

Fort | google

मराठा-पोर्तुगीज संघर्ष

तारापूर किल्ला हा पोर्तुगीज आणि मराठा यांच्यातील संघर्षाचा एक महत्त्वाचा साक्षीदार मानला जातो. तारापूर किल्ला हा अरबी समुद्र आणि नैसर्गिक खाडीने वेढलेला आहे.

Tarapur Fort | google

पालघर पर्यटन स्थळे

पालघर जिल्ह्यात ऐतिहासिक किल्ले, सुंदर समुद्रकिनारे निसर्गरम्य ठिकाणे आहेत. येथील जव्हार हे ठिकाण मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. पालघर जवळ केळवे बीच, डहाणू-बोर्डी बीच, वसईचा किल्ला ही पर्यटन स्थळे आहेत.

beach | yandex

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Fort | google

NEXT : बदलापूरजवळ डोंगररांगांमध्ये वसलाय निसर्गाचा अद्भुत खजिना, खूप कमी लोकांना माहितेय 'हे' ठिकाण

Badlapur Tourism | saam tv
येथे क्लिक करा...