
उधमपूरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.
चकमकीमध्ये एक जवान शहीद झाला. एसपीओसह ३ जण जखमी झालेत.
जैश-ए-मोहम्मदचे ३ दहशतवाद्यांना जवानांनी घेरले.
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये चकमक सुरू आहे. उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदचे ३ दहशतवादी लपून बसले आहेत. जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी परिसराला घेराव घातला आहे. शुक्रवारी रात्रीपासून या परिसरात चकमक सुरू आहे. या चकमकीमध्ये एका जवानाचा मृत्यू झाला तर एसपीओसह दोन पोलिस जखमी झाले आहेत. ही चकमक दूदू-बसंतगड आणि डोडाच्या भद्रवाहमधील सोजधार जंगलात होत आहे.
शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून ही चकमक सुरू आहे. जवानांच्या व्हाइट नाइट कॉर्प्स, जम्मू-काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन टीमकडून संयुक्तरित्या सर्च ऑपरेशन केले जात आहे. या कारवाई दरम्यान उदमपूरमध्ये लपून बसलेले जैशच्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. त्यानंतर चकमक सुरू झाली. जवानांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे.
शनिवारी सकाळी पुन्हा सर्च ऑपरेशन करण्यात आले. उधमपूर आणि डोडा दोन्ही ठिकाणी ड्रोन, हेलिकॉप्टरद्वारे दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. जम्मू-काश्मीर नॅशनल हायवेवर देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दहशतवाद्यांच्या शोधासाठी ऑपरेशन किश्तवाड सुरू केले गेले आहे. ज्याठिकाणी शुक्रवारी रात्री दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. ही चकमक सध्या सुरू असून त्यामध्ये एक जवान शहीद आणि ३ जण जखमी झाले आहेत.
यापूर्वी ८ सप्टेंबरला कुलगाममध्ये ऑपरेशन गूड्डर करण्यात आले. त्यावेळी झालेल्या चकमकीमध्ये दोन जवान शहीद झाले होते. कॅथलचे लान्सनायक नरेंद्र सिंधू आणि उत्तर प्रदेशचे पॅरा कमांडर प्रभात गौड हे दोघे शहीद झाले. या चकमकीमध्ये लष्कर-ए-तोएबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. यामधील एक जण शोपियामध्ये राहणारा आमिर अहमद डार आणि दुसरा विदेशी दहशतवादी रहमान भाई होता. आमिर लष्कर -ए-तोएबा या संघटनेशी जोडला गेला होता. सप्टेंबर २०२३ पासून तो सक्रीय होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.