Delhi Rape Case : ही तर हाथरससारखी घटना  saam tv news
देश विदेश

Delhi Rape Case : ही तर हाथरससारखी घटना

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विहंग ठाकूर

राजधानी दिल्लीतून (Delhi) काल एक सामुहिक बलात्काराची घटना उघडकीस आली. दिल्ली कॅंट पोलीस स्टेशन (Delhi Cantt police station) परिसरातील ओल्ड नांगलमध्ये एका 9 वर्षीय मुलीवर स्मशानभुमीत तिच्यावर बलात्कार (Rape) करुन तिला जिवंत जाळण्यात आले. या घटनेची दखल घेत कॉंग्रेस खासदार राहून गांधी यांनी आज पिडीतेच्या कुटंबीयांची भेट घेतली. (Delhi Rape Case: This is an incident like Hathras)

यावेळी राहूल गांधी यांनी पिडीतेच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. ''मी कुटुंबाशी बोललो आणि कुटुंब फक्त न्याय मागत आहे. त्यांना न्याय मिळत नसून त्यांना पूर्ण मदत देण्यात यावी, असे कुटुंबीय सांगत आहेत. जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि एक इंचही मागे हटणार नाहीत.'' असे त्यांनी म्हटले आहे. मात्र या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. हे प्रकरण आता चांगलेच शिगेला पोहचल्याचे दिसत आहे.

आरोपींनी 9 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, हत्या आणि नंतर जबरदस्तीने तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याचा आरोप केला आहे. या घटनेला परिसरातील लोकांनी उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार आणि दलित मुलीच्या हत्येसारखी घटना म्हणून सांगत आहेत. ही घटना उघकीस येताच स्थानिक नागरिकांनी या घटनेच्या निषेधार्थ स्मशानभूमीच्या बाहेर आंदोलन सुरू केले आहे. मात्र, पोलिसांनी या प्रकरणात आरोपी पुजाऱ्यासह चार जणांना अटक केली आहे.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sillod Politics : सिल्लोडमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांची एकाहाती सत्तार कोण भेदणार? महाविकास आघाडीकडून कोणाची तयारी? वाचा सविस्तर

Maharashtra News Live Updates: शरद पवार गटात सामील होताच हर्षवर्धन पाटील यांना मोठी जबाबदारी

VIDEO : अजित पवारांचा शिंगणे यांना फोन; नाराजी दूर करण्याचा अजितदादांचा प्रयत्न

Virat Kohli Record : रनमशीन कोहलीचा 'विराट' रेकॉर्ड; थेट तेंडुलकर-गावसकर क्लबमध्ये एन्ट्री

India vs New Zealand : विराट कोहली आणि सरफराजने डाव सावरला; भारताचं जोरदार कमबॅक, न्यूझीलंडकडे १२५ धावांची आघाडी

SCROLL FOR NEXT