धक्कादायक : दिल्लीत ९ वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार करुन जाळले

याप्रकरणी स्मशानभुमीतील पंडित आणि इतर तीन लोकांवर संशयित आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धक्कादायक  : दिल्लीत ९ वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार करुन जाळले
धक्कादायक : दिल्लीत ९ वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार करुन जाळले Saam tv news
Published On

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील नागपुरातील १६ वर्षीय मुलीच्या बलात्काराच्या घटनेला २४ तास उलटत नाहीत, तर राजधानी दिल्लीतून (Delhi) एक धक्कादायक पुन्हा एक सामुहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. (Shocking: 9-year-old girl gang-raped and burnt in Delhi)

दिल्ली कॅंट पोलीस स्टेशन (Delhi Cantt police station) परिसरातील ओल्ड नांगलमध्ये एका 9 वर्षीय मुलीचा मृतदेह संशयास्पद रित्या आढळून आला. स्मशानभुमीत तिच्यावर बलात्कार (Rape) करुन तिला जिवंत जाळण्यात आले. याप्रकरणी स्मशानभुमीतील पंडित आणि इतर तीन लोकांवर संशयित आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

DCP प्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर SC / ST कायदा, POCSO कायदा, बलात्काराच्या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान या प्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी नातेवाईकांना माहिती न देता निष्काळजीपणे मृत्यू, पुरावे नष्ट करणे आणि मृतदेहावर अंत्यसंस्कार करणे अशा प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केला होता. परंतु सोमवारी सायंकाळी एससी-एसटी आयोगासोबत झालेल्या बैठकीनंतर पोलिसांनी सामूहिक बलात्कार, हत्या, पॉक्सो, एससी-एसटी कायदा आणि जीवे मारण्याची धमकी यासह इतर अनेक कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

धक्कादायक  : दिल्लीत ९ वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार करुन जाळले
Jammu Kashmir: सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळले; बचाव कार्य सुरू

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास घडली. मुलीच्या मृत्यूनंतर, स्मशानभूमीचा पंडित आणि इतर दोन-तीन लोकांनी मुलीच्या आईला फोन केला. बाकावर पडलेल्या मुलीला दाखवत त्यांनी वॉटर कूलरचा करंट लागल्याने तुमच्या मुलीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. धक्कादायक म्हणजे, मुलीच्या मृत्यूनंतर पंडितने पोलीसांना न सांगण्यासाठी मृत मुलीच्या आईला 20 हजार रुपये देण्याची ऑफर दिली होती. घटनेनंतर काही लोकांनी पिडीत मुलीच्या जळणाऱ्या चितेवर पाणी टाकून आग विझवली. पण तोपर्यंत शरीर अर्ध्याहून अधिक जळाले होते.

या प्रकरणाच्या संदर्भात, रात्री साडेदहा वाजता पोलिसांना कॉल करण्यात आला आणि अल्पवयीन मुलीसोबत बलात्कार आणि मृत्यूची तक्रार करण्यात आली पोलीसांनी केलेल्या तापसात याप्रकरणी चार जणांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दिल्ली कॅंट पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com