Jammu Kashmir: सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळले; बचाव कार्य सुरू

काश्मीर मधील कठुआ जवळ मंगळवारी सकाळी भारतीय लष्कराचे एक हेलिकॉप्टर कोसळले आहे. कठुआच्या रणजीत सागर धरणाच्या तलावात हे हेलिकॉप्टर कोसळले आहे. घटनेनंतर मदतकार्य सुरू आहे, बचाव टीम तलावाजवळ पोहोचली आहे.
Jammu Kashmir: सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळले; बचाव कार्य सुरू
Jammu Kashmir: सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळले; बचाव कार्य सुरूSaam Tv
Published On

जम्मू -काश्मीर: जम्मू -काश्मीर मधील कठुआ जवळ मंगळवारी सकाळी भारतीय लष्कराचे एक हेलिकॉप्टर कोसळले आहे. कठुआच्या रणजीत सागर धरणाच्या तलावात हे हेलिकॉप्टर कोसळले आहे. घटनेनंतर मदतकार्य सुरू आहे, बचाव टीम तलावाजवळ पोहोचली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 3 ऑगस्ट रोजी सकाळी 10.20 च्या सुमारास भारतीय लष्कराच्या 254 आर्मी एव्हीएन स्क्वाड्रनचा हेलिकॉप्टरने मामुन कॅंटमधून उड्डाण केले. हेलिकॉप्टर धरण परिसराजवळ कमी उंचीचा फेरा घेत होता, त्यानंतर ते धरणात कोसळले.

अपघातानंतर एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली असून बचाव मोहीम सुरू आहे. कठुआ जिल्ह्याचे एसएसपी आर सी कोतवाल यांच्या मते, गोताखोरांच्या वतीने आता तलावात शोध मोहीम राबवली जात आहे. आर्मीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजीत सागर धरणात कोसळलेल्या आर्मी एव्हिएशन एएलएच ध्रुव हेलिकॉप्टरमधील दोन्ही वैमानिक सुरक्षित आहेत. वेपन सिस्टीम इंटिग्रेटेड हेलिकॉप्टर पठाणकोट (पंजाब) येथून उड्डाण केले होते आणि नियमित सॉर्टी मधून sortie अपघाताला झाला अशी माहिती दिली

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com