Live Hindustan
देश विदेश

Delhi Politics: दिल्लीत 'आप' मध्ये खिंडार; आजी-माजी आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

Bharat Jadhav

दिल्ली सरकारला भाजपने आपमधील नेत्यांना प्रवेश देत केजरीवाल यांना मोठा धक्का दिलाय. आपचे माजी मंत्री राजकुमार आनंद यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. राजकुमार आनंद यांच्यासोबत त्यांच्या पत्नी वीणा आनंद यांनीही भाजपचं कमळ हाती घेतलंय. या दोघांसह सध्याचे आम आदमी पार्टीचे आमदार करतार सिंह तन्वर यांनीही इतर नेत्यांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय.

दरम्यान पुढील वर्षी दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यादरम्यान राजकुमार आनंद यांचा भाजप प्रवेश होणं हा आम आदमी पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. राजकुमार आनंद आणि कर्तारसिंग तंवर यांच्याशिवाय रत्नेश गुप्ता, सचिन राय, माजी आमदार वीणा आनंद आणि आप नगरसेवक उमेद सिंह फोगट यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय.

दरम्यान भाजपमध्ये प्रवेश करताच राजकुमार यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केलाय. दलितांच्या कल्याणासाठीचा निधी गेला कुठे? असा प्रश्न राजकुमार आनंद यांनी यावेळी उपस्थित केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राज कुमार आनंद म्हणाले, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दलितांच्या कल्याणासाठी काम करण्याची विनंती केली होती, परंतु त्यांनी त्यांची विनंती फेटाळली होती, असं राजकुमार आनंद म्हणाले.

भाजपने मला पक्षात येण्याची संधी दिल्याचा मला आनंद आहे. सर्वांच्या आणि विशेषतः दलित समाजाच्या कल्याणासाठी मी कटिबद्ध असल्याचं राजकुमार आनंद म्हणाले. मी केजरीवाल यांना दलितांच्या कल्याणासाठी काम करण्यास सांगितले होते, पण त्यांनी माझी विनंती धुडकावून लावली.

दरम्यान, दिल्लीच्या कथित दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने न्यायालयात आरोपपत्र दाखल केलंय. या आरोपपत्रात त्यांनी दारू घोटाळ्यातून आम आदमी पक्षाला १०० कोटी रुपयांच्या लाच मिळाली. यापैकी ४५ कोटी रुपये थेट आम आदमी पक्षाला मिळाले होते. ही रक्कम त्यांनी गोवा विधानसभेत हवाला चॅनेलद्वारे वापरल्याचा आरोप ईडीने केलाय. मनी लाँड्रिंग गुन्ह्यात आम आदमी पार्टी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा सहभाग स्पष्टपणे दिसत असल्याचा दावा ईडीने आरोपपत्रात केलाय.  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण, शिवसेनेच्या सर्व्हेक्षणातून दावा

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT