रामनाथ ढाकणे, छत्रपती संभाजीनगर|ता. ८ जुलै २०२४
छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला असून माजी महापौर राजू शिंदे यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे. विधानसभेआधी राजू शिंदे यांच्यासारख्या बड्या नेत्याने साथ सोडल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. याबाबत बोलताना भाजप नेते भागवत कराड यांनी महत्वाचे विधान केले असून आगामी काळात बडे नेते भाजपमध्ये येणार आणि बडे धमाके होणार असल्याचे म्हटले आहे.
काय म्हणाले भागवत कराड?
"भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या 20 वर्षांपूर्वी कमळाच्या चिन्हावर निवडून आलेले एकमेव नगरसेवक म्हणजे राजीव शिंदे आहेत. दोन नगरसेवक सोडता कोणीही भारतीय जनता पार्टी सोडली नाही. त्यामुळे फार काही खिंडार आम्हाला पडला अशातला भाग नाही. आणि हे गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीला ही कोणता फरक पडणार नाही," असे भागवत कराड म्हणाले.
तसेच "लोकसभेची जागा आम्हाला सुटली नाही याची खदखद देखील त्यांच्या मनात होती. राजीव शिंदे यांना आगामी विधानसभा निवडणूक ही पश्चिम मतदार संघातून लढवायची आहे. त्यामुळे त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. मात्र महायुतीचे संजय शिरसाठ इथे विद्यमान आमदार आहेत. राजू शिंदे यांना ठाकरे गटात चांगली संधी मिळते त्यामुळे ते तिकडे गेले असावेत. त्यामुळे कोणतीही गळती पक्षाला लागलेली नाही," असेही ते पुढे म्हणाले.
दरम्यान, पश्चिम मतदार संघातून चंद्रकांत खैरे यांच्यासह दहा जण विधानसभेची तयारी करत असल्याचे दावा कराड यांनी केला आहे. त्यासाठी मला चार लोकांचे फोन आले. विधानसभेच्या पूर्वी आमच्याकडे देखील बडे नेते येणार असून बडे धमाके होणार असल्याचा दावा भागवत कराड यांनी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.