IAS Pooja Khedkar Case Saam Tv
देश विदेश

Pooja Khedkar: पूजा खेडकरला कधीही होऊ शकते अटक? हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

IAS Pooja Khedkar Case: यूपीएससी परीक्षेमध्ये फसवणूक आणि ओबीसी आणि अपंग कोट्याचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याप्रकरणी पूजा खेडकरच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हायकोर्टाने तिचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

Priya More

माजी प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ झाली आहे. पूजा खेडकरला अटक होण्याची शक्यता आहे. यूपीएससी परीक्षेमध्ये फसवणूक आणि ओबीसी आणि अपंग कोट्याचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याप्रकरणी पूजा खेडकरविरोधात दाखल करण्यात आलेल्या फौजदारी खटल्यासंदर्भात दिल्ली हायकोर्टात आज सुनावणी झाली. हायकोर्टाने पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला.

पूजा खेडकरने जामीनासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टाचे न्यायमूर्ती चंद्र धारी सिंह यांनी सांगितले की, पूजा खेडकरची जामीनासाठी दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. अटकेपासूनचे अंतरिम संरक्षण काढून टाकण्यात आले आहे. खेडकर यांच्यावर प्रथमदर्शनी भक्कम केस आहे. अशा परिस्थितीमध्ये या कटाचा उलगडा होण्यासाठी तपासाची गरज आहे. घटनात्मक संस्था तसेच समाजाची फसवणूक करण्याचे हे अनोखे प्रकरण आहे.'

पूजा खेडकरवर यूपीएससी परीक्षा २०२२ च्या अर्जामध्ये आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी चुकीची माहिती दिल्याचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांचे वकील आणि तक्रारदार युनियन लोकसेवा आयोगाच्या वकिलांनी पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनाच्या अर्जाला विरोध केला. याप्रकरणाच्या सुनावणीदरम्यान यूपीएससीच्या वतीने ज्येष्ठ वकील नरेश कौशिक आणि अधिवक्ता वर्धमान कौशिक न्यायालयामध्ये हजर होते.

यूपीएससीने जुलैमध्ये पूजा खेडकरवर कारवाई करण्यास सुरूवात केली. यामध्ये बनावट ओळख दाखवून नागरी सेवा परीक्षा क्रॅक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचाही समावेश आहे. दिल्ली पोलिसांनी भारतीय दंड संहिता, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि अपंग व्यक्तींचे हक्क कायद्याच्या तरतुदींनुसार पूजा खेडकरविरोधात गुन्हा नोंदवला. पण पूजा खेडकरने तिच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

SCROLL FOR NEXT