Pune News: पूजा खेडकर प्रकरणानंतर आता पुणे महापालिकेचे अधिकारी रडारावर, ७ जण चौकशीच्या कचाट्यात

Pune Latest News: पूजा खेडकर प्रकरणानंतर पुणे महापालिकेचे अधिकारी रडारावर आले असून दिव्यांग कल्याण आयुक्तांनी तक्रारीचे पत्र पुणे महानगरपालिका प्रशासनाकडे पाठवला आहे.
Pune News: पूजा खेडकर प्रकरणानंतर आता पुणे महापालिकेचे अधिकारी रडारावर, ७ जण चौकशीच्या कचाट्यात
Pooja Khedkar CaseSaam Digital
Published On

अक्षय बडवे, पुणे|ता. ९ सप्टेंबर

Pooja Khedkar News Update Pune: वादग्रस्त आएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगावरील दिव्यांग प्रमाणपत्रांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पुजा खेडकर प्रकरणाची गंभीर दखल घेत केंद्रीय आयोगाने त्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. अशातच आता पूजा खेडकर प्रकरणानंतर पुणे महापालिकेचे अधिकारी रडारावर आले असून दिव्यांग कल्याण आयुक्तांनी तक्रारीचे पत्र पुणे महानगरपालिका प्रशासनाकडे पाठवला आहे.

Pune News: पूजा खेडकर प्रकरणानंतर आता पुणे महापालिकेचे अधिकारी रडारावर, ७ जण चौकशीच्या कचाट्यात
Buldhana News: शेकडो रुग्णांचे प्राण वाचवणारा देवदूत! १५ किमीची पायपीट करत स्वखर्चाने करतोय उपचार

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बडतर्फ अधिकारी पूजा खेडकर यांचे प्रकरण देशभरात सध्या गाजत आहे. पूजा खेडकर यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दाखवत नोकरी मिळवल्याचे समोर आल्यानंतर लोकसेवा आयोगातील दिव्यांग प्रमाणपत्रांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अशातच पुण्यामधून एक मोठी बातमी समोर आली असून पूजा खेडकर प्रकरणानंतर पुणे महापालिकेचे अधिकारीही आता रडारावर आले आहेत.

त्यामुळे बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या तक्रारीनंतर 7 अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. पुणे महानगरपालिकेमधील सात अभियंत्यांनी सेवेत भरती होताना बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याच्या तक्रारी आल्या आहेत. दिव्यांग कल्याण आयुक्तांनी तक्रारीच पत्र पुणे महानगरपालिका प्रशासनाकडे पाठवला आहे. ज्या सात अभियंत्यांची दिव्यांग प्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार आली आहे

Pune News: पूजा खेडकर प्रकरणानंतर आता पुणे महापालिकेचे अधिकारी रडारावर, ७ जण चौकशीच्या कचाट्यात
Maharashtra Politics : 'माझ्या मुलगी अन् जावयाला नदीत फेकून द्या', धर्मरावबाबा आत्राम संतापले; काय आहे कारण?

या तक्रारीमध्ये अस्थिव्यंग प्रमाणपत्राच्या 3 अल्पदुष्टी प्रमाणपत्राच्या 3 आणि कर्णबधिर प्रमाणपत्राबाबत 1 तक्रार दाखल झाले आहे. ज्या अभियंत्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दिल्या असल्याची तक्रारी आहेत त्या संदर्भात अभियंत्यांच्या चौकशीच्या कार्यवाही बाबत आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे आता या सातही अधिकाऱ्यांची चौकशी होणार असून या चौकशीमध्ये कोणत्या बाबी समोर येतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Pune News: पूजा खेडकर प्रकरणानंतर आता पुणे महापालिकेचे अधिकारी रडारावर, ७ जण चौकशीच्या कचाट्यात
Nigeria Accident: तेल टँकर- ट्रकची धडक अन् भीषण स्फोट, ४८ जण ठार; ५० गुरे जिवंत जळाली

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com