मुंबई : पुण्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली. आता या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केलीय. पुण्यातील आंदेकर खून प्रकरणात हत्यारे पुरविणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. रविवारी ८ सप्टेंबर रोजी पोलिसांनी ही कारवाई केलीय. वनराज आंदेकरच्या खून प्रकरणात कोणी हत्यारे पुरवले? हे आपण सविस्तर जाणून घेवू या.
वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणात महत्त्वाची भूमिका संगम वाघमारे नावाच्या तरूणाने बजावली (Vanraj Andekar Killing Case) आहे. वाघमारेने आरोपींना हत्यारे पुरविणाचं काम केलंय. पोलिसांनी त्याला रविवारी अटककेलीय. संगम संपत वाघमारेचं वय २० वर्ष असल्याची माहिती मिळतेय. वाघमारेला ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
वनराज आंदेकर खून प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १५ पुरूषांसह एका महिलेला अटक केलीय. यामध्ये तीन अल्पवयीन मुलांना देखील समावेश आहे. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Vanraj Andekar Case) आहे. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान गुन्हे शाखा युनिट-२ चे वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जाधव आणि मोकाशी यांनी ही कारवाई (crime news) केली. वाघमारे याचा वनराज आंदेकर खून प्रकरणात सहभाग असल्याचं देखील निष्पन्न केलंय.
पोलिसांनी संगम वाघमारेला ताब्यात घेतलं, त्याची कसून चौकशी (Pune News) केली. तेव्हा वाघमारेने आंदेकर यांनी मारण्य्साठी वापरलेली हत्यारे (पिस्टल) आरोपी आकाश म्हस्के आणि अनिकेत दुधभाते यांच्यासह घेऊन आलो, असं पोलिसांनी सांगितले. आतापर्यंतच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालंय की, वाघमारे याने हत्यारे आणण्यात आणि पुरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आरोपी दीड महिन्यापासून वनराज आंदेकर यांच्या मागावर होता लक्ष ठेवून होते. अखेर आरोपीने १ सप्टेंबर रोजी आंदेकर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.