PM Narendra Modi  Saam Tv
देश विदेश

PM Narendra Modi Video: भारताला लवकरच गरिबीतून मुक्त करणार, पीएम मोदींचे जनतेला मोठं आश्वासन

Priya More

देशाच्या १८ व्या लोकसभेत शपथ घेण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'सरकार चालवण्यासाठी बहुमताची गरज असते. तसंच देश चालवण्यासाठी सहमतीची गरज असते. त्यामुळे सर्वांच्या सहमतीने निर्णय घेतले जातील आणि देशाच्या हिताचे काम व्हावे यासाठी आमचे सरकार प्रयत्न करेल. तिसऱ्या कार्यकाळात आमचे सरकार तिप्पट मेहनत करेल आणि देशाचा तीनपट अधिक विकास करेल. भारताला लवकरच गरिबीतून मुक्त करेल.', असे आश्वासन पीएम मोदी यांनी देशातील जनतेला दिले आहे. यावेळी त्यांनी सर्व नवनिर्वाचित खासदारांचे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

पीएम मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळाला आजपासून सुरूवात होत आहे. त्यासाठी पीएम मोदी नव्या संसद भवनात दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, 'लोकशाहीत आजचा दिवस गौरवदिन आहे. आजचा दिवस वैभवाचा आहे. पहिल्यांदाच आमच्या नव्या संसदेत हा शपथ समारंभ होत आहे. आतापर्यंत ही प्रक्रिया जुन्या संसद भवनात होत होती. आजच्या महत्वपूर्ण दिवशी मी सर्व खासदारांचे स्वागत आणि अभिनंदन करतो. सर्वांना शुभेच्छा देतो. नवीन उत्साहासोबत नवीन गती आणि नवीन उंची प्राप्त करण्यासाठी हा खूपच मोठा दिवस आहे.'

पीएम मोदींनी पुढे सांगितले की, 'ही निवडणूक यासाठी महत्वाची झाली की स्वातंत्र्यानंतर दुसऱ्यांदा एका सरकारला लागोपाठ तिसऱ्यांदा सेवा करण्यासाठी देशातील जनतेने संधी दिली. ही संधी ६० वर्षांनंतर आली आहे ही गौरवपूर्ण घटना आहे. स्वातंत्र्यानंतर एकाद्या सरकारला तिसऱ्यांदा जनतेची सेवा करण्यास मिळाली. गेल्या १० वर्षामध्ये देशाचा विकास केला. आम्ही सर्वांना सोबत घेऊन देशाची सेवा करणार आहोत. तिसऱ्यांदा देशाची सेवा करण्याची संधी मिळाली.'

तसंच, 'देश चालवण्यासाठी सहमती महत्वाची असते. आमचा निरंतर प्रयत्न राहिल प्रत्येकाच्या सहमतीने देशाची सेवा करू. देशातील जनेतेच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करू. आम्ही सर्वांना सोबत घेऊन चालणार आहोत. भारत लवकरच गरिबीतून मुक्त होईल. १८ वी लोकसभा संकल्पनांनी भरलेली आहे.', असे देखील पीएम मोदींनी सांगितले.

पीएम मोदी असे देखील म्हणाले की, ' उद्या २५ जून आहे. २५ जून या दिवशी भारताच्या लोकशाहीला लागलेल्या कलंकला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. उद्या आणीबाणीला २५ वर्षे पूर्ण होतील. भारताची राज्यघटना पूर्णपणे नाकारली गेली हे भारताची नवीन पिढी कधीच विसरणार नाही. आपल्या राज्यघटनेचे रक्षण करून, भारताच्या लोकशाहीचे आणि लोकशाही परंपरांचे रक्षण करण्यासाठी देशवासीय शपथ घेतील की, ५० वर्षांपूर्वी जे केले होते ते पुन्हा भारतात कोणीही करण्याची हिंमत करणार नाही. आम्ही चैतन्यशील लोकशाहीची शपथ घेऊ. आम्ही संकल्प करू. भारतीय राज्यघटनेच्या सूचनेनुसार सामान्य माणसाची स्वप्ने पूर्ण करू.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi Thane Visit: पीएम मोदींच्या ठाण्यातील सभेसाठी वाहतुकीमध्ये मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Marathi News Live Updates : महायुतीतल्या नेत्यांमध्ये पुन्हा जुंपली; भरसभेत एकमेकांना कोपरखळ्या

Cake Cancer News : सावधान! केक खाल्ल्याने कॅन्सर होतो, खळबळ उडवून देणारा दावा; व्हायरल मॅसेजमागचं सत्य काय?

Ishan Kishan: इशान किशनचं टेन्शन वाढलं! हा स्टार खेळाडू जागा घेण्यासाठी तयार; आता कमबॅक करणं कठीण

Gold Silver Rate : सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी वाढ, चांदी २ हजार रुपयांनी महागली; आजचा भाव वाचलात का?

SCROLL FOR NEXT