PM Modi Selfie Booth: खर्च सांगणं PROला पडलं महागात; पीएम मोदींच्या सेल्फी बूथची किंमत सांगितल्याने अधिकऱ्याची बदली

PM Modi 3D Selfie Booth : आरटीआयमध्ये बूथची माहिती दिल्यामुळे मध्य रेल्वेने मुख्य जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) शिवराज मानसपुरे यांची बदली केलीय. दरम्यान मानसपुरे यांचा कार्यकाळ संपण्याआधी त्यांची बदली करण्यात आलीय. दरम्यान काँग्रेसने सेल्फी बूथवरून भाजपवर निशाणा साधलाय.
PM Modi 3D Selfie Booth
PM Modi 3D Selfie BoothSaam Tv
Published On

PM Modi 3D Selfie Booth Cost RTI:

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या थ्रीडी सेल्फी बूथ आणि सेल्फी पॉइंटच्या खऱ्या किमतीची माहिती दिल्यामुळे एका रेल्वे अधिकाऱ्याची बदली करण्यात आलीय. भारतीय रेल्वेने अनेक स्थानकांवर पंतप्रधानांचे सेल्फी बूथ लावले आहेत. अशाच एका बुथच्या खर्चाची माहिती एकाने माहितीच्या अधिकारातून विचारली होती. त्याचं उत्तर देणं रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याला महागात पडलं आहे. (Latest News)

अधिकाऱ्याची बदली

आरटीआयमध्ये (RTI)बूथची माहिती दिल्यामुळे मध्य रेल्वेने (Central Railway)मुख्य जनसंपर्क अधिकारी (Chief Public Relations Officer) शिवराज मानसपुरे यांची बदली केलीय. दरम्यान मानसपुरे यांचा कार्यकाळ संपण्याआधी त्यांची बदली (transfer) करण्यात आलीय. दरम्यान काँग्रेसने (Congress)सेल्फी बूथवरून भाजपवर निशाणा साधलाय.

बदली करण्यात आलेले अधिकारी मानसपुरे हे २०११ बॅचचे आयआरटीएस अधिकारी आहेत. त्यांनी मे महिन्यात सीपीआरओ म्हणून कार्यभार संभाळला होता. २९ डिसेंबर रोजी त्यांची मुंबई मुख्य कार्यालयात बदली करण्यात आली. बदलीचं कोणतेच कारण सांगण्यात आले नाहीये.

दरम्यान त्यांच्या जागेवर नवीन अधिकारी स्वप्निल डी नीला यांनी तेथील कार्यभार संभाळलाय. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मानसपुरे यांना त्यांच्या बदलीची कल्पना देखील देण्यात आली नव्हती. दरम्यान मानसपुरे यांना बदलीचा आदेश येण्याआधी रेल्वे बोर्डाने २८ डिसेंबर रोजी सर्व जीएम आणि डीआरएमना आरटीआय कायद्यांतर्गत मागितलेल्या माहिती देताना काळजी घेण्यास सांगण्यात आलं होतं.

कामानिमित्त झालाय सन्मान

मानसपुरे हे त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी ओळखले जातात. भुसावळ विभागात असताना त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलीय. वरिष्ठ विभागीय कमर्शिल व्यवस्थापक म्हणून त्यांचा कार्यकाळ चांगला होता. या काळात त्यांनी रेल्वेची कमाई वाढवण्यासाठी आणि तिकीटविरहित प्रवास आणि चोरी याप्रकराला तोंड देण्यासाठी विविध उपाय योजना केल्या होत्या.

  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यांच्या त्या विशेष प्रयत्नांसाठी त्यांचा सन्मान करण्यात आलाय. हा पुरस्कार केंद्रीय रेल्वे मंत्री (Union Railway Minister)अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांच्या हस्ते १५ डिसेंबर २०२३ रोजी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला होता. आता अचानक झालेल्या बदलीनेमुळे त्यांना धक्का बसलाय. मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील सामाजिक कार्यकर्ते अजय बोस यांनी सेल्फी बूथची माहिती विचारली होती. बोस यांनी दाखल केलेल्या माहितीच्या अधिकारात मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, दक्षिण रेल्वे, उत्तर रेल्वे आणि उत्तर पश्चिम रेल्वे या पाच झोनमधील सेल्फी बूथचा खर्च विचारला होता.

बोस यांना डिसेंबरमध्ये थ्रीडी बूथच्या संख्येबाबत रेल्वे विभागांकडून वेगवेगळी उत्तरे मिळाली होती. तात्पुरते आणि कायमस्वरूपी बूथ बनवण्याच्या खर्चाबाबत मध्य रेल्वे वगळता एकाही विभागाने बोस यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. अजय बोस यांना या अंतर्गत एकूण १८७ बूथची माहिती मिळाली, त्यापैकी हिंदी पट्ट्यात १०० हून अधिक बूथ उत्तर रेल्वेच्या अंतर्गत आहेत.

आरटीआयनुसार नागपूर, मुंबई, पुणे, भुसावळ आणि सोलापूर या ५ विभागातील ३० स्थानकांवर तात्पुरते सेल्फी बूथ आणि २० स्थानकांवर कायमस्वरूपी सेल्फी बूथ बनवण्यात आले आहेत. वर्ग-अ स्थानकावरील प्रत्येक तात्पुरत्या बूथची किंमत १.२५ लाख रुपये होती, असं उत्तर मध्य रेल्वेने दिले आहे. तर क वर्ग स्थानकांवर कायमस्वरूपी बूथच्या निर्मितीचा खर्च हा ६.२५ लाख रुपये होता.

सेल्फी बूथची माहिती दिल्यानंतर झालेल्या बदली प्रकरणावर बोस म्हणाले, मध्य रेल्वेकडून माहिती उपमहाव्यवस्थापक (पीआयओ-मुख्यालय) अभय मिश्रा यांनी प्रदान केली होती, परंतु सीपीआरओ काढून टाकण्यात आले आहे. पण आरटीआयला उत्तर दिल्याने मानसपुरे यांची बदली झाली नाही, असं नीला म्हणालेत. वरिष्ठांकडून हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगत त्यांनी याविषयी अधिक बोलण्यास नकार दिला.

PM Modi 3D Selfie Booth
Lok Sabha Election : तिसरी बार मोदी सरकार, अबकी बार ४०० पार'; लोकसभेसाठी भाजपचा नवा नारा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com