India-Bangladesh: भारत आणि बांगलादेशात मोठे करार; व्यापार, सागरी सीमा सुरक्षेसह विविध क्षेत्रात होणार भागीदारी

India and Bangladesh: गेल्या काही वर्षांत भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंधांमध्ये झपाट्याने बदल होताहेत. शुक्रवारी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान शेख हसीना यांचे पंतप्रधान मोदींनी जोरदार स्वागत केले. दोन्ही पंतप्रधानांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली.
India-Bangladesh: भारत आणि बांगलादेशात मोठे करार; व्यापार, सागरी सीमा सुरक्षेसह विविध क्षेत्रात होणार भागीदारी
India and BangladeshTv9
Published On

भारत आणि बांगलादेशात व्यापार, सागरी सीमा सुरक्षा, डिजिटल देवाणघेवाण यासह अनेक क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी करार झाला. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना शुक्रवारपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन अनेक मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा केली.

दोन्ही देशांच्या पंतप्रधानांची भेट हैदराबाद हाऊसमध्ये झाली. यावेळी पंतप्रधान मोदींनी शेख हसीना यांचे उत्साहात स्वागत केले. शेख हसीना यांच्याशी भेट झाल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, बांगलादेश हा भारताचा सर्वात मोठा विकासाचा भागीदार आहे. बांगलादेशसोबतच्या आमच्या संबंधांना विशेष प्राधान्य देतो. बंगबंधूंचे स्थिर, समृद्ध आणि प्रगतीशील बांगलादेशचे स्वप्न साकार करु असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

कोणत्या क्षेत्रात करार झाला?

बांगलादेशातील वैद्यकीय रुग्णांसाठी ई-व्हिसा

बांगलादेशातील रंगपूर येथे भारताचे नवीन सहायक उच्चायुक्त

राजशाही आणि कोलकातादरम्यान नवीन रेल्वे सेवा

चितगाव आणि कोलकातादरम्यान नवीन बस सेवा

गेडे-दर्शन आणि हल्दीबारी-चिलाहाटी दरम्यान डाळगावपर्यंत मालगाडी सेवा सुरू केली जाणार.

अनुदानाअंतर्गत सिराजगंज येथे अंतर्देशीय कंटेनर डेपो (ICD) चे बांधकाम केलं जाणार.

बांगलादेशातील तीस्ता नदीचे संवर्धन आणि व्यवस्थापन प्रकल्पासाठी तांत्रिक शिष्टमंडळ बांगलादेशला जाणार. बांगलादेशी पोलीस अधिकाऱ्यांसाठी ३५० प्रशिक्षण स्लॉट

रुग्णांसाठी मुक्तीयोद्धा योजना

डिजिटल भागीदारीत मोठा करार

भारत आणि बांगलादेशामध्ये डिजिटल भागीदारी अंतर्गत करार झालेत. भारताचे परराष्ट्र सचिव आणि बांगलादेशच्या परराष्ट्र सचिवांनी डिजिटल सहकार्याशी संबंधित कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. दोन्ही देशांमध्ये हरित भागीदारीबाबतही करार झाला. दोन्ही देशांदरम्यान सागरी सहकार्य आणि ब्लू इकॉनॉमी यासंबंधीही करार झालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com