Girish Mahajan News: 'भाजप सोडल्यानंतर सगळ्यांना जागा दिसली, गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंना टोला, म्हणाले...

Maharashtra Politics Latest News: "उद्या मंत्री गिरीश महाजन जरी पक्षातून गेला तरी फरक पडणार नाही. आम्ही मोठे आहोत ते पक्षाचा भरोशावर आहोत," असे म्हणत गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला.
Girish Mahajan News: 'भाजप सोडल्यानंतर सगळ्यांना जागा दिसली, गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंना टोला; पाहा VIDEO
girish mahajan eknath khadseSaamtv

जळगाव, ता. २४ जून २०२४

जळगावत भारतीय जनता पक्षाच्या वतीने जळगाव लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी समीक्षा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री गिरीश महाजन भाजपचे निरीक्षक आमदार खासदार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागण्याच्या सुचना यावेळी करण्यात आल्या. यावेळी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यासह उन्मेष पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.

Girish Mahajan News: 'भाजप सोडल्यानंतर सगळ्यांना जागा दिसली, गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंना टोला; पाहा VIDEO
Kolhapur Accident: बेधुंद तरुणाचा 'कार'नामा! दुकानासमोर बसू न दिल्याच्या रागातून ३ दुचाकींना उडवले; संतप्त जमावाने दिला बेदम चोप | VIDEO

काय म्हणाले गिरीश महाजन?

"2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी स्मिता वाघ यांना मीच तिकीट नाकारलं होत. त्यावेळी मला विजयाबाबत थोडी शंका होती. माझ्याच सांगण्यावरून स्मिता वाघ यांचं तिकीट कापण्यात आलं होतं. मात्र ज्यांनी तिकीट मिळालं त्यांना तब्बल पाच लाखांच्या मताधिक्याने निवडून आणलं. मात्र यावेळी उमेदवारी मिळाली नाही म्हणून.. ते दुसऱ्या पक्षात गेले आणि मित्राला बळीचा बकरा केला," असा टोला उन्मेष पाटील यांंना लगावला.

एकनाथ खडसेंवर निशाणा!

तसेच "या निवडणुकीत अनेक लोकांचा माज उतरला. उद्या मंत्री गिरीश महाजन जरी पक्षातून गेला तरी फरक पडणार नाही. आम्ही मोठे आहोत ते पक्षाचा भरोशावर आहोत. भाजप पक्ष सोडल्यानंतर सगळ्यांना सगळ्यांची जागा दिसलेली आहे. मी मी म्हणणारे मी म्हणणारे आता कसे बसले आहेत. मी मी म्हणणाऱ्यांची काय अवस्था झाली आहे हे सर्वांनी बघितलं आहे," असे म्हणत गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर नाव न घेता टीका केली.

Girish Mahajan News: 'भाजप सोडल्यानंतर सगळ्यांना जागा दिसली, गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंना टोला; पाहा VIDEO
Nanded News: नांदेडमध्ये भाजपला धक्का! माजी मंत्री सूर्यकांता पाटील शरद पवार गटाच्या वाटेवर? आज पक्षप्रवेश होण्याची शक्यता

विधानसभेचे रणशिंग फुंकले!

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत संपूर्ण अकराच्या अकरा विधानसभा मतदारसंघांमधील जागा जिंकण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला असून पदाधिकाऱ्यांनी आजपासूनच कामाला लागावे अशा सूचना बैठकीत मार्गदर्शन करताना नेत्यांच्या वतीने पदाधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत.

Girish Mahajan News: 'भाजप सोडल्यानंतर सगळ्यांना जागा दिसली, गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंना टोला; पाहा VIDEO
Sangli Politics: पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचा तोही सांगलीचा: विश्वजीत कदम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com