सासरच्यांनी तिला अॅसिड प्यायला लावले
सासरच्यांनी तिला अॅसिड प्यायला लावले  Saam tv
देश विदेश

सासरच्यांनी तिला अॅसिड प्यायला लावले, आणि...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : दिल्लीच्या किराडी भागात राहणाऱ्या एका विवाहितेला तिच्या सासरच्यांनी अॅसिड प्यायला लावल्याची घटना समोर आली आहे. जानेवारी २०२१ मध्ये विवाहितेच्या सासरच्या लोकांनी तिला जबरदस्तीने अॅसिड प्यायला लावले. त्यानंतर तब्बल ६ महिन्यांनी ही घटना उघडकीस आली आहे. या महिलेवर दिल्लीतील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दिल्ली महिला आयोगाने (Delhi Commission for Women) या घटनेची माहिती दिली आहे. पिडीत महिला ग्वालियारची आहे. 20 जुलै रोजी पीडितेच्या भावाने डीसीडब्ल्यू हेल्पलाइन नंबर 181 वर फोन करून मदत मागितली, तेव्हा ही बाब उघडकीस आली. महिलेच्या पती आणि नंनद यांनी तिला अॅसिड पाजल्याचे महिलेच्या भावाने सांगितले. या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचे यावेळी पिडीतेच्या भावाने सांगितले. मात्र डीसीडब्ल्यूने ह्स्तक्षेप करताच मध्यप्रदेश पोलीसांनी घरगुती हिंसाचार आणि अॅसिड हल्ल्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिल्ली महिला आयोगाला या प्रकरणाची माहिती मिळताच आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल आणि सदस्या प्रमिला गुप्ता यांनी रुग्णालयात पीडित विवाहितेची भेट घेतली. १८ जुलै रोजी महिलेला दिल्लीत उपचारासाठी आणण्यात आले. प्रकृती गंभीर असून तिचे शरीर खूप अशक्त झाले आहे. याप्रकरणी आयोगाने उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) यांच्यासमोर महिलेचे निवेदन रेकॉर्ड केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच्या पतीचे विवाहबाह्य संबंध होते. जेव्हा ही बाब विवाहितेला कळाली तेव्हा तिच्या पती आणि ननंद यांनी तिला मारहाण करुन तिला जबरदस्तीने अॅसिड प्यायला लावले. दरम्यान, या प्रकरणी स्वाती मालीवाल यांनी मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर सहा महिलने उलटूनही याची तक्रार न घेतलेल्या पोलीसांवर देखील कारवाई करण्याची मागणी मालीवाल यांनी या पत्रातून केली आहे.

दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीत ईशान्येकडील मुलींच्या छेडछाडीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. राजधानी दिल्लीत काही रोडरोमियो मुलींची छेडछाड करत असल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्यानंतर स्वाती मालीवाल यांनी दिल्ली पोलीसांना याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dia Mirza : हँसता हुआ नूरानी चेहरा; काली ज़ुल्फ़ें रंग सुनहरा...

Skin Care Tips: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे; जाणून घ्या

Maharashtra Politics: भाषणादरम्यान रोहित पवार ढसाढसा रडले, अजित पवारांनी भरसभेत केली नक्कल; VIDEO

Today's Marathi News Live : सोलापूरचं तापमान ४४.४ अंशावर, नागरिक उष्णतेने हैराण

Dehydration Treatment : 'या' ज्यूसचे सेवन केल्याने रखरखत्या उन्हात डि-हायड्रेशन पासून राहाल दूर

SCROLL FOR NEXT