संतापजनक! जीन्स घालते म्हणून तरुणीची हत्या

देशामध्ये अनेक धक्कादायक घटना घडताना दिसून येत आहेत.
संतापजनक! जीन्स घालते म्हणून तरुणीची हत्या
संतापजनक! जीन्स घालते म्हणून तरुणीची हत्याSaam Tv

नवी दिल्ली : देशामध्ये अनेक धक्कादायक घटना घडताना दिसून येत आहेत. अशीच एक संतापजनक घटना आता परत एकदा समोर आली आहे. जीन्स का घालते, म्हणून एका तरुणीला तिच्या काका Uncle आणि आजोबांनी Grandfather हत्या Murder केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेश Uttar Pradesh मधील देवरिया Deoria मधील नात्याला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे.

१७ वर्षीय तरुणीला तिच्या काका आणि आजोबांनी जीन्स घालून नको असे वारंवार सांगितले होते. मात्र, ती त्याची ही गोष्ट ऐकण्यास कायम नकार दिले. यामुळे संतापलेल्या या दोघांनी टोकाचे पाऊल उचलत तिची हत्या केली आहे. आलेल्या माहितीनुसार, मुलीचे वडील लुधियाना Ludhiana मध्ये नोकरी करत असल्याने ही मुलगी आपल्या आई- वडिलांसोबत शहरात राहत होती.

हे देखील पहा-

मात्र, सध्या कोरोना Corona काळात हे कुटुंब गावी आले होते. शहराप्रमाणे गावात जीन्स घालून फिरायला मुलीच्या काकाचा आणि आजोबांचा विरोध होता. यावरून त्या मुलीमध्ये आणि काकामध्ये खूप वेळेस वादही झाले आहे. हाच राग मनात मध्ये ठेऊन काकाने आणि मुलीच्या आजोबांनी तिला बेदम मारहाण केली होती. दोघांनी केलेल्या मारहाणी दरम्यान तिचा भिंतीवर डोके आपटून या मुलीचा मृत्यू झाला आहे.

संतापजनक! जीन्स घालते म्हणून तरुणीची हत्या
तरुणीची फेसबुकद्वारे बदनामी

आपला गुन्हा लपवण्याकरिता या दोघांनी तो मृतदेह गावाबाहेर नेहून नदीत फेकून देण्याचा प्रयत्न त्यांनी केले आहे. मात्र, मृतदेह Corpses खाली फेकत असताना, मुलीचा पाय रेलिंगमध्ये अडकला आणि मृतदेह नदीच्या पुलावर लटकू लागला होता. यानंतर आपला गुन्हा उघडकीला येईल, या भीतीने दोघेही त्या ठिकाणाहून पळ काढला आहे.

आईने दिलेल्या माहितीवरून पोलीस Police या मुलीचा शोध घेत होते. पोलिसांना हा मृतदेह नदीच्या पुलावर लटकत असलेल्या अवस्थेत आढळून आले आहे. या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com