Delhi Unnatural act by a young man abused stray dogs : दिल्लीमधून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका तरूणाने १३ भटक्या कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य केलेय. त्या कृत्याचे व्हिडिओ काढले. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दिल्लीकरांनी संताप व्यक्त केला. दिल्ली पोलिसांनी त्या तरूणाला बेड्या ठोकल्या असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला खाकी दाखवली, त्याची त्याच परिसरातून धिंड काढली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या धक्कादायक प्रकारानंतर दिल्लीकरांनी संताप व्यक्त केला असून आरोपीला कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीमधील कैलास नगर परिसरात हा संतापजनक प्रकार घडला. एका व्यक्तीने भटक्या १३ कुत्र्यांवर लैंगिक अत्याचार केला. संतापजनक घटना समोर आल्यानंतर स्थानिक नागरिक आणि प्राणीप्रेमींनी त्या व्यक्तीला बेदम मारले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
१० एप्रिल २०२५ रोजी हा संतापजनक आणि धक्कादायक प्रकार घडला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती भटक्या कुत्र्यावर अत्याचार करताना दिसतोय. या व्हिडीओमुळे प्राणीप्रेमींमध्ये तीव्र संताप निर्माण झाला. दुसऱ्या एका व्हिडीओत, "व्हॉइस फॉर ॲनिमल्स ११" या सोशल मीडिया हँडलवर, या व्यक्तीला जमावाने घेरून मारहाण केली. जमावातील लोक त्याला विचारतात, "कितने कुत्तों के साथ किया, बता!" यावर तो म्हणतो की त्याने सहा कुत्र्यांवर अत्याचार केले. एका महिलेचा दावा आहे की, या व्यक्तीने तब्बल १३ कुत्र्यांवर अत्याचार केले.
आरोपीने एका महिलेबरोबरही असभ्य टिप्पणी केली होती. त्या महिलेने दावा केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. महिलेने पोलिसांत त्याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्या महिलेने आरोपीला लाडकाने जोरदार मारले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पोलिस ठाण्यात बसलेल्या आरोपीचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.