Arundhati Roy Saam Tv
देश विदेश

Arundhati Roy: अरुंधती रॉय यांच्याविरोधात यूएपीए अंतर्गत चालणार खटला, नायब राज्यपालांनी दिली परवानगी; काय आहे प्रकरण?

Delhi Lieutenant Governor: दिल्लीच्या नायब राज्यपालांनी अरुंधती रॉय आणि डॉ. शेख शौकत हुसेन यांच्याविरुद्ध यूएपीए कायद्यांतर्गत खटला चालवण्याची परवानगी दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी सामाजिक कार्यकर्त्या आणि बुकर पुरस्कार विजेत्या लेखिका अरुंधती रॉय आणि माजी प्राध्यापक डॉ. शेख शौकत हुसेन यांच्यावर यूएपीए अंतर्गत खटला चालवण्यास मान्यता दिली आहे. 2010 मध्ये दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी ही परवानगी देण्यात आली आहे. राज निवास यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

राजभवन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काश्मीरमधील सामाजिक कार्यकर्ते सुशील पंडित यांच्या तक्रारीच्या आधारे नवी दिल्लीतील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने २८ ऑक्टोबर २०१० रोजी दिलेल्या आदेशानंतर अरुंधती रॉय आणि शेख शौकत हुसेन यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता.

राज्यपालांच्या कार्यालयाने सांगितले की, 'अरुंधती रॉय आणि शेख शौकत हुसैन यांनी 21.10.2010 रोजी नवी दिल्लीच्या एलटीजी ऑडिटोरियममध्ये 'आझादी - द ओन्ली वे' या बॅनरखाली आयोजित केलेल्या परिषदेत कथितपणे प्रक्षोभक भाषणे केली होती.

परिषदेत ज्या मुद्द्यांवर चर्चा झाली, त्यात, काश्मीर भारतापासून वेगळे करण्याचा प्रपोगंडा याचा समावेश आहे. तसेच काश्मीर हा कधीही भारताचा भाग नव्हता आणि भारतीय सैन्याने बळजबरीने त्यावर कब्जा केला आहे, असा प्रचार केल्याचा रॉय यांच्यावर आरोप आहे

अरुंधती रॉय आणि शौकत हुसेन यांच्या व्यतिरिक्त या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या काश्मिरातील फुटीरतावादी नेते सैयद अली शाह गिलानी, संसदेवरील हल्ल्याप्रकरणी निर्दोष सुटलेले दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक एसएआर गिलानी आणि कार्यकर्ते वरावरा राव यांचा समावेश होता. मात्र या तिघांचाही मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महिला विश्वचषकात भारताचा विजय, जेमिमा रॉड्रिग्ज वडिलांना मिठी मारून रडली, मुंबईच्या लेकीचा भावुक क्षणाचा VIDEO

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - चिपळूणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्त्वपूर्ण बैठक

Indrayani : 'इंद्रायणी' मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री; दिग्रसकरांच्या कुटुंबावर मोठे संकट, पाहा VIDEO

Pav Bhaji Recipe: मुंबई स्टाईल चमचमीत पावभाजी कशी बनवायची?

Ladki Bahin Yojana: ऑक्टोबर संपला, तरीही हप्ता आला नाही, लाडकीला ₹१५०० कधी मिळणार?

SCROLL FOR NEXT