Arvind Kejriwal Saam Tv
देश विदेश

Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरूंगातच मारण्याचं षडयंत्र; 'आप' नेत्याचा गंभीर आरोप

Delhi Liquor Scam: दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या तिहार तरुंगात आहेत. तुरुंगात त्यांना मारण्याचा कट केला जात असल्याचा आरोप आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी केला आहे.

Rohini Gudaghe

दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी (Delhi Liquor Scam) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या तिहार तरुंगात आहेत. तुरुंग प्रशासन केजरीवाल यांना डॉक्टरांचे उपचार घेऊ देण्याची मागणी मान्य करीत नसून, यातून केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना संपविण्याचा कट रचला आहे, असा गंभीर आरोप आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी शनिवारी (२० एप्रिल) पत्रकार परिषदेत केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात आहेत. त्यांचा डाएट चार्ट आणि इन्सुलिनची मागणी याबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, दिल्ली सरकारचे आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज (Saurabh Bhardwaj) यांनी मोदी सरकार आणि एलजी विनय कुमार सक्सेना यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सौरभ भारद्वाज म्हणाले की, तुरुंगात केजरीवाल यांच्या हत्येचा कट रचला जात आहे. त्यांना संथपणे मृत्यूच्या दारात धकलले जात आहे.

सौरभ भारद्वाज म्हणाले की, केजरीवाल यांची साखरेची पातळी खूप वाढली आहे. त्यामुळे ते वारंवार इन्सुलिनची मागणी करत आहेत, मात्र त्यांना सुविधा दिली जात नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली (Arvind Kejriwal News) आहे. साखरेची पातळी वाढल्यामुळे नसा, मूत्रपिंड, डोळे आणि हृदयावर परिणाम होतो. तो कधीही बरा होऊ शकत नाही.

एलजी विनय कुमार सक्सेना यांच्यावर निशाणा साधत सौरभ भारद्वाज म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांची किडनी निकामी झाली तर ते परत देऊ शकतील का? तुम्ही त्यांचे यकृत ठीक करू शकत (Arvind Kejriwal Health) नाही. त्यांचे डोळे ठीक करू शकत नाही. केजरीवाल यांच्या हत्येचा कट तुरुंगात रचला जात असल्याचं पूर्ण जबाबदारीने सांगत असल्याचं सौरभ भारद्वाज म्हणाले आहेत. सौरभ भारद्वाज म्हणाले की, “दोन-चार महिन्यांनंतर केजरीवाल तुरुंगातून बाहेर येतील, तेव्हा त्यांचे अनेक अवयव खराब होतील, असा कट रचला जात आहे.

आप नेत्या आतिशीने सीएम केजरीवाल यांच्या आरोग्याचा अहवाल सोशल मीडियावर शेअर केला आहे. अहवाल शेअर करताना त्यांनी लिहिलंय की , “हे १२ एप्रिल ते १७ एप्रिलदरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi Politics) यांच्या साखरेच्या पातळीचे रिपोर्ट आहे. इतक्या उच्च साखरेच्या पातळीवर इन्सुलिन न दिल्यास, व्यक्तीचे हळूहळू अवयव निकामी होतात. हे क्रूर सरकार मधुमेही रुग्णांना इन्सुलिन देण्यास नकार देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mrunal Thakur Photos : जादू तेरी नजर; मृणालचं सौंदर्य पाहून काळजाचा ठोका चुकेल

Maharashtra Live News Update : संतोष देशमुख हत्या प्रकरणाला सुरूवात, उज्वल निकम न्यायालयात दाखल

Heart attack symptoms women: महिलांमध्ये दिसणारी हार्ट अटॅकची लक्षणं पुरुषांपेक्षा का वेगळी असतात? पाहा महिलांच्या शरीरात कोणते बदल होतात

Pune News: पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, माथेफिरू तरुणाला अटक; उत्तर प्रदेश कनेक्शन उघड

Palghar : पालघरमधील एमआयडीसीत कंपनीला भीषण आग | VIDEO

SCROLL FOR NEXT