Arvind Kejriwal : ४८ दिवसात एकदा प्रसाद अन् ३ वेळा आंबे; केजरीवाल यांच्या खाण्यावरून कोर्टात आरोप प्रत्यारोप

Arvind Kejriwal Court News : अरविंद केजरीवाल यांच्या गोड पदार्थ खाण्यावरून दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. त्यावर आता सोमवारी निकाल देण्यात येणार आहे.
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal Saam Digital

प्रमोद जपताप

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात असून जामीन मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. दरम्यान ईडीने अरविंद केजरीवाल यांच्या गोड खाण्यावर आक्षेप घेतला आहे. त्यांना मधुमेह आहे, मात्र ते वैद्यकीय कारण देऊन जामीन मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक गोड पदार्थ खात असल्याचा दावा केला आहे, दरम्यान दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर गोड पदार्थांवरचा निर्णय न्यायालयाने राखून ठेवला आहे. त्यावर आता सोमवारी निकाल देण्यात येणार आहे.

अरविंद केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी कोर्टात, अरविंद केजरीवाल यांच्या घरातून 48 वेळा जेवण आलं आहे त्यात फक्त 3 वेळेला आंबे आले होते, असा युक्तीवाद केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या साखरेची पातळी तपासणारा चार्टही न्यायालयासमोर ठेवला. डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन बघायला सांगितले. तसंच आपल्या अनुभवात आंबे खाण्याबाबत कोणतीही तक्रार पाहिली नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

या प्रकरणात तुरुंग प्रशासनाने ईडीच्या सहकार्याने मीडिया ट्रायल घेण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामध्ये त्यांच्या खाण्याच्या सवयींमुळे अर्जदाराची साखरेची पातळी वाढत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अरविंद केजरीवाल यांनी चहामध्ये साखर टाकल्याचा ईडीने दावा केला आहे, मात्र त्यांनी चहामध्ये शुगर फ्री चहा घेतली, कारण ते मधुमेहाचे रुग्ण आहेत, अंस सिंघवी यांनी कोर्टासमोर सांगितलं.

Arvind Kejriwal
Manipur News: मणिपूरमध्ये मतदान केंद्रावर गोळीबार! ३ जखमी; EVM मशिनही तोडले

दिल्ली सरकारच्या मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली आहे. सध्या ते तिहार तुरुंगात आहेत. केजरीवाल यांना सुरुवातीला १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र १५ एप्रिल रोजी त्यांना ईडीने न्यायालयासमोर हजर केलं आणि चौकशीसाठी आणखी काही दिवसांच्या कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ही मागणी मान्य करत त्यांच्या कोठडीत २३ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. त्यानंतर त्यांचा जामीनही नाकारण्यात आला होता.

Arvind Kejriwal
Israel Attack On Iran: मोठी बातमी! इस्रायलचा इराणवर हल्ला; क्षेपणास्त्र डागल्याचा दावा, अनेक शहरं हादरली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com