Manipur News: मणिपूरमध्ये मतदान केंद्रावर गोळीबार! ३ जखमी; EVM मशिनही तोडले

Manipur Loksabha Election Voting 2024: मणिपूरमधील लोकसभेच्या दोन जागांवर आज मतदान सुरू आहे. अशातच मतदानावेळी गोळीबार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
Manipur Loksabha Election Voting 2024:
Manipur Loksabha Election Voting 2024: Saamtv

गेल्या अनेक महिन्यांपासून जातीय हिंसाराने धुमसत असलेल्या मणिपूरमध्ये आज लोकसभेचे मतदान होत आहे. मणिपूरमधील लोकसभेच्या दोन जागांवर आज मतदान सुरू आहे. अशातच मतदानावेळी गोळीबार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तसेच ईव्हीएमचीही तोडफोड झाल्याचे सांगण्यात येत आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, मणिपूरमधील (Manipur) मोइरांग भागातील थामनपोकपी येथील एका मतदान केंद्राजवळ समाजकंटकांच्या एका गटाने अनेक राऊंड गोळीबार केला. गोळीबारामुळे मतदानासाठी रांगेत उभे असलेल्या मतदारांमध्ये एकच खळबळ उडाली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये गोळीबाराच्या आवाजात लोक मतदान केंद्राबाहेर पळताना दिसत आहेत. या गोळीबारात ३ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येतआहे.

त्याचबरोबर एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, इतर काही ठिकाणीही अशा प्रकारे हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. इनर मणिपूर लोकसभा मतदारसंघांतर्गत थोंगजू विधानसभा मतदारसंघात स्थानिक लोक आणि अज्ञात हल्लेखोर यांच्यात मारामारी झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

Manipur Loksabha Election Voting 2024:
Madha Loksabha Election 2024: शरद पवारांनी डाव टाकला अन् माढ्यातील बंड शमलं; महायुतीचं टेन्शन आणखीच वाढलं!

दरम्यान, मणिपूरमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 15.44 लाखांहून अधिक मतदारांपैकी सुमारे 28.19 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाच्या पहिल्या दोन तासांत, अंतर्गत मणिपूर मतदारसंघात 29.40 टक्के मतदान झाले, तर बाह्य मणिपूरमध्ये 26.02 टक्के मतदान झाले. बाह्य मणिपूर आणि अंतर्गत मणिपूरच्या काही भागांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेत मतदान होत आहे.

Manipur Loksabha Election Voting 2024:
Raigad Election: रायगडमध्ये मतदारांसमोर गुगली; सुनील तटकरी आणि २ अनंत गीते निवडणूक आखाड्यात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com