Madha Loksabha Election 2024: शरद पवारांनी डाव टाकला अन् माढ्यातील बंड शमलं; महायुतीचं टेन्शन आणखीच वाढलं!

Sharad Pawar And Abhay Jagtap: बंडाच्या भूमिकेमध्ये असलेल्या अभयसिंह जगताप यांनी आज माध्यमांशी संवाद साधत आम्ही साहेबांना एकटं सोडणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. त्यांच्या या निर्णयामुळे आता महायुतीचे टेन्शन वाढलं आहे.
Madha Loksabha Election 2024
Sharad Pawar And Abhay JagtapSaam Tv
Published On

माढा लोकसभा मतदार संघामध्ये (Madha Loksabha Election 2024) अभयसिंह जगताप (Abhay Jagtap) यांचे बंड शमवण्यात शरद पवार (Sharad Pawar) यांना यश मिळाले आहे. त्यामुळे आता माढा लोकसभा मतदार संघामध्ये महायुतीच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. बंडाच्या भूमिकेमध्ये असलेल्या अभय जगताप यांनी आज माध्यमांशी संवाद साधत आम्ही साहेबांना एकटं सोडणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. त्याचसोबत 'महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार.' असल्याचे अभयसिंह जगताप यांनी सांगितले.

माढा लोकसभा मतदारसंघात महविकास आघाडीकडून इच्छुक असणारे आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असणारे उमेदवार अभय जगताप यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर होताच बंडाचा पवित्रा घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून ते नाराज असून बंड पुराकरणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण आता त्यांची मनधरणी करण्यात शरद पवारांना यश आले आहे.

Madha Loksabha Election 2024
Sharad Pawar Speech: गुरुजी किती वय झालं? भर सभेत शरद पवारांनी ९४ वर्षांच्या कार्यकर्त्याला थेट नावासह ओळखलं| VIDEO

शरद पवार यांनी मध्यस्थी करत अभय जगताप यांची समजूत काढली. अखेर माढ्यातील हे बंड थोपवण्यात शरद पवार यांना यश आलेले आहे. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या ताकदीमध्ये वाढ झाली आहे. असामध्ये महायुतीचे उमेदवार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या मात्र अडचणी वाढल्या आहेत. माध्यमांशी संवाद साधताना अभय जगताप यांनी सांगितले की, 'या वाईट परिस्थितीमध्ये शरद पवारसाहेबांना एकटे सोडणार नाही.' तसंच, 'त्यांच्याबद्दल असणारी निष्ठा आम्ही कायम ठेऊ.', असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

Madha Loksabha Election 2024
Supriya Sule: 'मी नात्याचा आणि पदाचा सन्मान केला, पण...', सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली खंत

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नाराज अभयसिंह जगपात यांनी शरद पवारांची भेट घेतली. ते माढा लोकसभेसाठी इच्छुक होते. धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अभयसिंह जगताप नाराज झाले होते. माढा लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. जयंत पाटील यांनी त्यांना अपक्ष उमेदवारी अर्ज भरू नका अशी विनंती देखील केली होती.

अभयसिंह जगपात यांनी सांगितल होते की, 'मी माढा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होतो. मी अनेक स्वप्न माढा लोकसभा मतदारसंघातून पाहिली होती. पण स्वप्न पूर्ण होताना दिसत नाहीत. मी कुठल्याही उमेदवाराचे काम करणार नाही. मी स्वतः अपक्ष किंवा वंचित बहुजन आघाडी आणि राजू शेट्टी यांच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे'.

Madha Loksabha Election 2024
Raigad Election: रायगडमध्ये मतदारांसमोर गुगली; सुनील तटकरी आणि २ अनंत गीते निवडणूक आखाड्यात

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com