Supriya Sule: 'मी नात्याचा आणि पदाचा सन्मान केला, पण...', सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली खंत

Baramati Loksabha Election 2024: सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज प्रचाराला नारळ फोडला. बारामतमधील कन्हेरी मारुती मंदिरात त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला. यानंतर बारामतीमध्ये घेण्यात आलेल्या सभेमध्ये सुप्रिया सुळे यांनी बारामतीकरांशी संवाद साधला.
Baramati Loksabha Election 2024
Supriya Sule NewsSaam TV

बारामती लोकसभा मतदारसंघातून (Baramati Loksabha Election 2024) महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहिलेल्या शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज प्रचाराला नारळ फोडला. बारामतमधील कन्हेरी मारुती मंदिरात त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला. यानंतर बारामतीमध्ये घेण्यात आलेल्या सभेमध्ये सुप्रिया सुळे यांनी बारामतीकरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी 'मी नात्याचा सन्मान केला, पदाचा सन्मान केला, पण आता हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा.', असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी खंत व्यक्त केली.

सुप्रिया सुळे यांनी बारामतीतील सभेदरम्यान अजित पवार यांचे नाव न घेता खंत व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, 'मला काही जण म्हणले होते मी बारामतीमध्ये कमी येते. पण असं ठरलं होतं की मी दिल्लीत असणार आणि बाकीची कामं इथले लोकं करणार. मी नात्याचा सन्मान केला, पदाचा सन्मान केला, पण आता हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. झालं गेलं गंगेला वाहिलं. पण आता बदल करावा लागेल. आपली वैचारिक लढाई आहे वैयक्तिक नाही. '

Baramati Loksabha Election 2024
Sharad Pawar Speech: गुरुजी किती वय झालं? भर सभेत शरद पवारांनी ९४ वर्षाच्या कार्यकर्त्याला थेट नावासह ओळखलं| VIDEO

सुप्रिया सुळे यांनी पुढे सांगितले की, 'माझं काम आणि मेरिट बघून मला संधी द्या. बारामतीची निवडणूक अमेरिकापर्यंत पोहचली आहे. न्यूयॉर्क टाईमचे पत्रकार २ दिवसांपासून बारामतीमध्ये आले आहेत. मी एक पुस्तक विरोधकांना पाठवणार आहे. ज्यात मी काय काय काम केलं हे दाखवणार आहे. उद्या जे जे कन्हेरीमध्ये येतील ते मलाच मतदान करतील.'

Baramati Loksabha Election 2024
Madha Loksabha Election 2024: शरद पवारांनी डाव टाकला अन् माढ्यातील बंड शमलं; महायुतीचं टेन्शन आणखीच वाढलं!

तसंच, सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर देखील निशाणा साधला आहे. त्यांनी सांगितले की, 'एकीकडे संसदरत्न देतात आणि दुसरीकडे मला निलंबित करतात. मला फाशी दिली तरी चालेल पण मी कांद्याला भाव मागत राहणार. आपआपल्यात भांडण लावून ते दिल्लीत बसून मजा बघतात. दिल्लीवाल्यांना नडतो कोण तर मी आणि अमोल कोल्हे. फार भानगड नाही करायची आपण आपली तुतारी वाजवायची आपलं एकच लक्ष राम कृष्ण हरी. सेवा, सन्मान, स्वाभिमान या ३ गोष्टी धरून मी राजकारण करते.' असं त्यांनी सांगितले.

Baramati Loksabha Election 2024
Raigad Election: रायगडमध्ये मतदारांसमोर गुगली; सुनील तटकरी आणि २ अनंत गीते निवडणूक आखाड्यात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com