Raigad Election: रायगडमध्ये मतदारांसमोर गुगली; सुनील तटकरी आणि २ अनंत गीते निवडणूक आखाड्यात

Raigad Lok Sabha Constituency: रायगडमध्ये लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या नावाशी साधर्म्य असणारा उमेदवार रिंगणात उतरला आहे.
Raigad Election
Raigad ElectionSaam Tv

सचिन कदम साम टीव्ही, रायगड

रायगडमध्ये लोकसभा निवडणूकीची (Raigad Lok Sabha Constituency) रणधुमाळी सुरू आहे. महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या नावाशी साधर्म्य असणारा उमेदवार रिंगणात उतरला आहे. रायगडमध्ये मतदारांसमोर आता गुगली निर्माण होणार आहे. सुनील तटकरी आणि दोन अनंत गीते निवडणूक आखाड्यात आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सुनील तटकरी (Sunil Tatkari) रिंगणात उतरले आहेत.

रायगड लोकसभेसाठी सुनील दत्ताराम तटकरी नावाच्या व्यक्तीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याअगोदर रायगड लोकसभेसाठी सुनील तटकरी यांचा उमेदवारी अर्ज (Raigad Election) दाखल केला होता. त्यामुळे रायगडमध्ये आता मतदारांसमोर संभ्रम निर्माण होण्याची शक्यता दिसून येत आहे. अशीच खेळी अनंत गीते यांच्याविरोधात देखील खेळण्याचा प्रयत्न केला गेला (Raigad News) आहे.

सध्या रायगड लोकसभा मतदारसंघाची सगळीकडे चर्चा होत आहे. कारण रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सुनिल तटकरे आणि अनंत गीते यांच्यात लढत होत आहे. महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे (Maharashtra Politics) तर महाआघाडीचे अनंत गीते उमेदवार आहेत. आता या दोघांचेही डुप्लिकेट रिंगणात उतरले आहेत. यामुळे सुनील तटकरे यांना मिळणारी मते चुकून (Mahayuti Candidate) उमेदवार सुनील तटकरीला पडल्यास मतफुटी होण्याची शक्यता आहे. याचा सुनील तटकरे यांना फटका बसणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Raigad Election
Raigad Politics: अजित पवारांनी डाव टाकला, रायगडमध्ये शेकापला खिंडार; शेकडो पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या नावाशी साधर्म्य असलेले (Maharashtra Election) आणखी दोन अनंत गीते नावाच्या व्यक्तींनी यापूर्वीच अर्ज भरलेला आहे. मतदारांना चकवा देण्यासाठी रायगडमध्ये राजकीय खेळी खेळली जात आहे. आपण इतिहासात पाहिलं आहे की, उमेदवारांच्या नावात साधर्म्य (Lok Sabha) असल्यास प्रमुख उमेदवाराला मोठा फटका बसतो. आता रायगडमध्ये तटकरे आणि गीते यांना फटका बसणार का? फायदा होणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Raigad Election
Raigad Politics: रायगड लोकसभेवरुन महायुतीत वादाच्या ठिणग्या; शिंदे गटाच्या आमदारांचा सुनील तटकरेंना इशारा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com