ऐन लोकसभा निवडणूक तोंडावर असताना रायगडमध्ये अनंत गिते यांच्या शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. शेकापचा बालेकिल्ला असलेल्या मुरुडमधील हजारो कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (ता. ८) हा प्रवेश सोहळा पार पडलाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
लोकसभा निवडणुकीत रायगडमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना शह देण्यासाठी शेकापचे अनंत गिते यांनी चांगलीच तयारी केली आहे. कुठल्याही परिस्थितीत तटकरेंचा पराभव करायचा असा निर्धारच अनंत गिते यांनी ठेवला आहे. (Latest Marathi News)
हीच बाब लक्षात घेता अजित पवार यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर डाव टाकत शेकापला खिंडार पाडलंय. शेकापचा बालेकिल्ला असलेल्या मुरुंडमधील शेकापचे जिल्हा सहचिटणीस मनोज भगत, अजित कासार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना अजित पवार यांनी राष्ट्रवादीत सामील करून घेतलंय.
या प्रवेशामुळे रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे यांची ताकद वाढल्याचं बोललं जातंय. दरम्यान, या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर मंत्री धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे यांनी शेकापचे नेते अनंत गिते यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आमच्या अध्यक्षांची तुम्ही अशी चेष्टा करत असाल, तर इथून पुढच्या काळात तुमची जिल्ह्यात देखील ताकद राहणार नाही, असा इशारा धनंजय मुंडे यांनी गिते यांना दिला आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी रायगडमध्ये मोठा विजय मिळवला होता. यावेळी देखील ते अजित पवार गटाकडून लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून अनंत गिते यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.