Lok sabha Election 2024
Lok sabha Election 2024Saam Tv

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीचं जागावाटप ४ जागांवरुन अडलं? तिढा कधी मिटणार?

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीच्या या जागावाटपाकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. महाविकास आघाडीच्या लोकसभेचं जागावाटप नेमकं कुठं अडलं आहे, याबाबत महत्वाची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सुनील काळे, मुंबई

Maha vikas Aghadi Latest News :

भाजपने राज्यातील लोकसभेच्या २० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, दुसरीकडे महाविकास आघाडीकडून राज्याच्या एकाही उमेदवाराचं नाव जाहीर केलेलं नाही. महाविकास आघाडीच्या या जागावाटपाकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. महाविकास आघाडीच्या लोकसभेचं जागावाटप नेमकं कुठं अडलं आहे, याबाबत महत्वाची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Latest Marathi News)

महाविकास आघाडीचं जागावाटप चार जागांवरुन अडलं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सांगली, भिवंडी, रामटेक, वर्धा या जागांवरुन महाविकास आघाडीत चढाओढ पाहायला मिळत आहे. सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. तर भिवंडीच्या जागेसाठी पवार गट आग्रही आहे.

Lok sabha Election 2024
VBA On Praniti Shinde: ताई; नवीन पक्षाचा मुहूर्त कधी? वंचित आघाडीचे प्रणिती शिंदेंवर टीकास्त्र; भाजपच्या पोस्टरवर फोटो लावत निशाणा

सांगलीला विशाल पाटील काँग्रेसचे संभाव्य उमेदवार तर ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील संभाव्य उमेदवार आहेत. तर भिवंडीला बाळ्या मामा म्हात्रे राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार तर काँग्रेसकडून दयानंद चोरगे इच्छुक आहेत.

रामटेकची जागा राखीव असून तिथून काँग्रेस उमेदवार देण्यासाठी आग्रही आहे. तर वर्ध्याच्या जागेसाठी काँग्रेस आणि शरद पवार गटात स्पर्धा असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपचा तिढा कधी सुटणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Lok sabha Election 2024
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांच्या बॅनर विरोधात धडक कारवाई; परळी पालिका प्रशासनाने हटवले बॅनर्स

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय ठरला?

महाविकास आघाडीने जागावाटप करताना दोन फॉर्मुला तयार केल्याचा माहिती हाती आली आहे. मविआच्या जागावाटपाची यादी सामच्या हाती आली आहे. महाविकास आघाडीचा वंचित बहुजन आघाडीला सोडून २२-१६-१० चा फॉर्म्युला जवळपास निश्चित असल्याचं बोललं जात आहे. महाविकास आघाडीला वंचितला सोबत घेतल्यास २०-१५-९-४ यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला २०, काँग्रेस पक्षाला १५, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरदचंद्र पवार पक्षाला ९, वंचित बहुजन आघाडीला ४ जागा असणार आहेत.

'वंचित'ला शिवसेना गटाच्या कोट्यातून २, काँग्रेस पक्षाच्या कोटातून १ आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोट्यातून १ जागा देण्यावर तिन्ही पक्षाची तयारी असल्याचे बोलले जात आहे. तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी यांना शेतकरी स्वाभिमानी पक्षाला महाविकास आघाडी बाहेरून पाठींबा देणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com