Sharad Pawar Speech: गुरुजी किती वय झालं? भर सभेत शरद पवारांनी ९४ वर्षांच्या कार्यकर्त्याला थेट नावासह ओळखलं| VIDEO

Baramati Loksabha News: प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर शरद पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले. या सभेत बोलताना शरद पवार यांनी पुन्हा एकदा गर्दीत बसलेल्या कार्यकर्त्याची नावासह ओळख सांगितली.
Sharad Pawar Speech: गुरुजी किती वय झालं? प्रचंड गर्दीतून शरद पवारांनी ९४ वर्षाच्या कार्यकर्त्याला ओळखलं; थेट नाव सांगितलं| VIDEO
Sharad Pawar Speech:Saamtv
Published On

अक्षय बडवे, पुणे|ता. १९ एप्रिल २०२४

बारामतीमधून महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आज प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी बारामती तालुक्यातील कन्हेरीच्या मारुती मंदिरात संपूर्ण पवार कुटुंबिय उपस्थित होते. प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर शरद पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले. या सभेदरम्यान शरद पवार यांच्या अफाट स्मरणशक्तीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. भाषणावेळी शरद पवार यांनी गर्दीत बसलेल्या कार्यकर्त्याची नावासह ओळख सांगितली, ज्यानंतर सभेत एकच जल्लोष पाहायला मिळाला.

काय म्हणाले शरद पवार?

"निवडणुकीची सुरूवात आपण कन्हेरीमधून करतो. ही अनेक वर्षांची प्रथा आहे जी कधी चुकली नाही. अनेकांनी याठिकाणी सेवा केली. पुण्याच्या एका कॉलेजचे प्राचार्य श्री. सोनोपंत दांडेकर हे शिकवणी झाली की इथे यायचे. ही प्रथा पुढे काळे बुवा यांनी सुरू केली. जुन्या पिढीला आठवत असेल असे म्हणत शरद पवार यांनी समोर बसलेल्या गृहस्थाला तुम्ही झगडे गुरूजी का? किती झालं वय?" असा सवाल करत थेट ओळख सांगितली.

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रश्नावर ९४ वय झाल्याचे गुरूजींनी सांगितले. त्यावर शरद पवार यांनीही '९४ वय म्हणजे माझ्यापेक्षा १० वर्ष वडील. काय भारी काम आहे,' अशी कोपरखळी मारली. शरद पवार यांनी भरगर्दीत बसलेल्या कार्यकर्त्यांची ओळख सांगितल्यानंतर सभेतील तरुणांनी एकच जल्लोष केला.

Sharad Pawar Speech: गुरुजी किती वय झालं? प्रचंड गर्दीतून शरद पवारांनी ९४ वर्षाच्या कार्यकर्त्याला ओळखलं; थेट नाव सांगितलं| VIDEO
Supriya Sule: 'मी नात्याचा आणि पदाचा सन्मान केला, पण...', सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली खंत

मोदी शहांवर निशाणा

"या देशाची घटना मोदी साहेबांना बदलायची आहे असं एक मंत्री म्हणले ते ही मोदी सरकार मधील आहेत. अमित शहा नावाचे एक गृहस्थ आहेत. १० वर्षात शरद पवारांनी काय केलं याचा हिशोब द्या असं अमित शहा म्हणाले. मागच्या १० वर्षात सत्तेत कोण होतं? आणि मला हिशोब मागतात, " असा टोलाही शरद पवार यांनी लगावला. (Targeted Modi, Shah in speech)

Sharad Pawar Speech: गुरुजी किती वय झालं? प्रचंड गर्दीतून शरद पवारांनी ९४ वर्षाच्या कार्यकर्त्याला ओळखलं; थेट नाव सांगितलं| VIDEO
Chaitra Ekadashi Yatra : पंढरीत दोन लाख भाविक दाखल; विठ्ठल दर्शनासाठी एक किमी लांब रांग

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com