.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट
एकनाथ शिंदेंनी केली मोठी घोषणा
ही योजना सुरुच राहणार- एकनाथ शिंदे
लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत. लाडकी बहीण योजनेत मात्र दर महिन्याला हप्ता पुढे ढकलण्यात येत आहे. त्यामुळे दर महिन्याला महिलांना हप्त्यासाठी वाट पाहावी लागते. दरम्यान, आतादेखील डिसेंबर संपून जानेवारीचा पहिला आठवडादेखील संपत आला तरीही लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झालेला नाही.
महिलांना पैसे कधी मिळणार असा प्रश्न सतावत आहे. याचसोबत सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी आहे. ही निवडणूक संपल्यानंतर लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नसल्याचे अनेकजण सांगत आहेत. निवडणुकीनंतर हप्ता बंद होईल, असा आरोप विरोधकांनी केली आहे. यावर आता एकनाथ शिंदेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदे काय म्हणाले? (Eknath Shinde Big Annoucement on Ladki Bahin Yojana)
निवडणुकानंतर लाडकी बहीण योजना बंद होईल, असा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यावर एकनाथ शिंदेंनी उत्तर दिले आहे. त्यांची काल अमरावतीमध्ये सभा होती. यावेळी त्यांनी लाडक्या बहिणींना आश्वासन दिले आहे. लाडक्या बहिणींना विधानसभा निवडणुकीत चमत्कार दाखवला आहे. मी गरीबी पाहिली, काटकसर पाहिली. अनेकजण योजना बंद पाडण्यासाठी कोर्टात गेले, खोडा घालणाऱ्यांना लाडक्या बहिणींनी जोडा हाणला आहे. कोणीही ही योजना बंद पाडू शकच नाही, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली आहे.
देवेंद्र फडणवीसांनी केले आवाहन (Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojana)
सध्या राज्यात निवडणुकीनिमित्त अनेक प्रचारसभा होतात. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, राज्यातील ५० लाख लाडक्या बहिणींना लखपती दीदी करणार, असं त्यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत महिलांना रोजगाराची संधी निर्माण होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.