देवळी नगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारीवरून राजकीय वाद
काँग्रेसकडून भाजपवर घराणेशाहीचा आरोप
वर्ध्यात लाडकी बायको योजना सुरु
भाजप-काँग्रेससह अपक्षांमुळे निवडणूक चुरशीची
चेतन व्यास, वर्धा
Ladki Bayko Yojana: राज्यभरात लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरु असताना वर्ध्यात मात्र लाडकी बायको योजना सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. वर्धा जिल्ह्यातील देवळीत माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस यांना चालता येत नसतानाही त्यांना उमेदवारी देऊ केली आहे. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहे मात्र कार्यकर्त्यांना न देता स्वतःच्या बायको अध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. अशी टीका काँग्रेसचे माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
येत्या २० डिसेंबरला वर्धा जिल्ह्याच्या देवळी नगरपालिकेच्या निवडणुकीचा मतदान होणार आहे. मागील ४० वर्षांपासुन या नगरपालिकेवर भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांची सत्ता आहे. या वेळेस रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस यांना उमेदवारी देण्यात आल्याने त्यांच्यावर टिकेची झोड उठवली जातं आहे.
उमेदवारीअर्जाच्या शेवटच्या एक दिवसापूर्वी पर्यंत देवळीत भाजपा कार्यकर्त्याच्या नाव अध्यक्षपदासाठी होते, मात्र वेळेवर रामदास तडस यांच्या पत्नीचे नाव पुढे आले. ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे मात्र नेते आपल्या पत्नीला निवडणुकीत उतरवत आहे अशी टीका प्रचाराच्या कार्यक्रमादरम्यान काँग्रेसचे माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली.
वर्ध्याच्या देवळी येथे काँग्रेस उमेदवार सुरेश वैद्य यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके, वक्ता गोविंद पोलाड यांच्यासह सर्व उमेदवारांची उपस्थिती होती. देवळीत भाजपा आणि काँग्रेसमध्ये लढत असून अपक्ष उमेदवार सुद्धा आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. यामुळे ही निवडणूक भाजपासाठी चूरशीची ठरत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.