Ambernath : अंबरनाथकरांसाठी गुड न्यूज! पाणी टंचाईची झंझट संपणार, नालिंबी जलशुद्धीकरण प्रकल्प अंतिम टप्प्यात

Ambernath Water Supply Project News : अंबरनाथ शहरातील पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी नालिंबी येथे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहराला 90 MLD पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे.
Ambernath : अंबरनाथकरांसाठी गुड न्यूज! पाणी टंचाईची झंझट संपणार, नालिंबी जलशुद्धीकरण प्रकल्प अंतिम टप्प्यात
Ambernath Water Supply Project NewsSaam Tv
Published On
Summary
  • अंबरनाथमधील पाणीटंचाई इतिहास जमा होणार

  • नालिंबी येथील जलशुद्धीकरण प्रकल्प वेगाने प्रगतीपथावर

  • प्रकल्प पूर्ण झाल्यावर 90 MLD पाणीपुरवठा उपलब्ध

  • पुढील 50 वर्षांचा पाणीपुरवठा कायमस्वरूपी सुनिश्चित

अजय दुधाणे, अंबरनाथ

अंबरनाथकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अनेक वर्षांपासून भेडसावणारी पाण्याची भीषण टंचाई लवकरच सुटणार आहे. कारण शहराचा पुढील ५० वर्षांचा पाणीपुरवठा कायमस्वरूपी सुरळीत करण्यासाठी उभारण्यात येत असलेला महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेगाने पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत आहे. या प्रकल्पामुळे अंबरनाथ शहराला पुरेपूर पाणी पुरवठा होणार असून पाण्याची समस्या नाहीशी होणार आहे.

अंबरनाथ पश्चिमेकडील नालिंबी येथे सुरू असलेल्या जल शुध्दीकरण प्रकल्पाच्या काम सध्या प्रगतीपथावर असून . शहरातील वाढती पाण्याची गरज लक्षात घेता या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे.कल्याण लोकसभाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागला असून येत्या एक ते दीड वर्षांत तो पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे.

Ambernath : अंबरनाथकरांसाठी गुड न्यूज! पाणी टंचाईची झंझट संपणार, नालिंबी जलशुद्धीकरण प्रकल्प अंतिम टप्प्यात
Mumbai : लिओनेल मेस्सी आज मुंबईत, शहरातील वाहतुकीत मोठा बदल, वाचा पर्यायी मार्ग कोणते?

अनेक वर्षांपासून शहरातील पाणीटंचाईवरून विरोधकांकडून सातत्याने टीका होत असतानाच, शिवसेनेने या टीकेला प्रत्यक्ष विकासकामांतून उत्तर दिले आहे. आमदार बालाजी किणीकर यांनी कामांची पाहणी करून अधिकाऱ्यां कडून माहिती घेऊन सूचना दिल्या,प्रकल्प सुरू झाल्यानंतर अंबरनाथकरांना मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. अस मत शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा वाळेकर यांनी व्यक्त केलं.

Ambernath : अंबरनाथकरांसाठी गुड न्यूज! पाणी टंचाईची झंझट संपणार, नालिंबी जलशुद्धीकरण प्रकल्प अंतिम टप्प्यात
Leopard : ४ पाय कापलेले, १८ नखे गायब, ऊसाच्या शेतात आढळला बिबट्याचा मृतदेह, साताऱ्यात खळबळ

दरम्यान हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहराला सुमारे ९० MLD पाणी उपलब्ध होणार आहे. नाळिंबी गावाजवळ उभारण्यात येणारा हा शहरातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा जलकुंभ आहे. या माध्यमातून अंबरनाथ पूर्व, पश्चिम तसेच ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरातील नागरिकांची पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com