Delhi Jama masjid Protest Latest News Update in Marathi SAAM TV
देश विदेश

Nupur Sharma News: नुपूर शर्मा, जिंदाल यांच्याविरोधात दिल्ली, महाराष्ट्रात निदर्शने; अटकेची मागणी

नुपूर शर्मा आणि जिंदाल यांच्याविरोधात मुस्लीम समाज आक्रमक झाला असून, दिल्लीतील जामा मशिदीबाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

साम ब्युरो

नवी दिल्ली: पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणावरून सुरू झालेला वाद काही थांबताना दिसत नाही. दिल्लीत जामा मशिदीबाहेर नमाज पठणानंतर नुपूर शर्मा यांच्याविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. तसेच देशातील अन्य भागांतही आंदोलन करण्यात आलं. तसेच निदर्शकांनी नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या अटकेची मागणी केली. (Delhi Jama masjid Protest against Nupur Sharma)

दिल्लीच्या (Delhi) जामा मशिदीपासून ते कोलकाता आणि उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये नुपूर शर्मा आणि नवीन जिंदल यांच्याविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. प्रयागराजमध्ये निदर्शकांनी दगडफेक केल्याचे वृत्त आहे. हावडामध्येही निदर्शकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचे वृत्त आहे. त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.

महाराष्ट्रातील सोलापूरमध्येही मोर्चा

सोलापुरात एमआयएमने नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्याविरोधात मोर्चा (Protest) काढला. शर्मा आणि जिंदाल यांना अटक करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दींच्या नेतृत्वात हजारो नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. पनवेल आणि औरंगाबादमध्येही निदर्शने करण्यात आली.

लखनऊमध्ये समाज आक्रमक

उत्तर प्रदेशातील लखनऊ, देवबंद, प्रयागराज आणि सहारनपूरमध्येही समाज आक्रमक झाला होता. देवबंदमध्ये पोलिसांनी काही निदर्शकांना ताब्यात घेतलं आहे.

जामा मशिदीसमोर जोरदार घोषणाबाजी

जामा मशिदीबाहेर निदर्शकांनी नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणीक केली. तसेच यावेळी दोघांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation: दोन सप्टेंबरचा GR हा फक्त मराठवाड्यापुरताच; मराठा आरक्षणावर बावनकुळेंचा मोठा खुलासा

Maharashtra Live News Update: मनमाडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शानदार पथ संचालन

Saturday Horoscope: मिथूनसह ५ राशींचे मन अस्वस्थ राहिल! नुकसान होईल, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Pune Tourism : महाराष्ट्रात राहून परदेशाचा अनुभव घ्यायचाय? मग दिवाळीच्या सुट्टीत पुण्याजवळील 'हे' ठिकाण पाहाच

Horoscope: आजचा दिवस आनंद, सुख समृद्धीचा; ६ राशींच्या जीवनात घडणार मोठा बदल, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT