"हिंदुस्थानवर ही वेळ भाजपच्या कर्माने आली"; नुपूर शर्मा प्रकरणावरुन सेनेचा सामनातून हल्ला

Shivsena Slams BJP In Saamana Editorial : सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकार आणि मोदी सरकार धर्मांध असल्याची बोचरी टीका करण्यात आली आहे.
Shivsena Slams BJP, Nupur Sharma News
Shivsena Slams BJP, Nupur Sharma NewsSaam TV
Published On

मुंबई: भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी इस्लामिक धर्मगुरु मोहम्मद पैगंबर (Muhammad ibn Abdullah) यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने देशासह आंतरराष्ट्रीय वातावरण तापलं आहे. पैगंबर यांच्या अपमानाप्रकरणी अनेक आखाती देश भारतावर नाराज आहेत. आपल्याच प्रवक्त्यामुळे अडचणीत आलेल्या सत्ताधारी भाजपच्या (BJP) राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असली तरी हा वाद अजूनही संपलेला नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची झालेली नाचक्की यामुळे शिवसेनेने आपल्या सामना (Saamana) या मुखपत्रातून भाजपचा समाचार घेतला आहे. सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकार आणि मोदी सरकार धर्मांध असल्याची बोचरी टीका करण्यात आली आहे. तसेच "हिंदुस्थानवर ही वेळ भाजपच्या कर्माने आली" असा आरोपही सामनातून करण्यात आला आहे. (Nupur Sharma Latest News)

हे देखील पाहा -

सामना अग्रलेखातून काय टीका करण्यात आली आहे?

सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर आणि सत्ताधारी भाजपवर गंभीर आरोप करण्यात आले आहे. कतारसारख्या नखभर देशाने भारताने माफी मागायलाच हवी असे बजावले, हे धक्कादायक आहे असं सामना अग्रलेखात म्हटलंय. भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे जगातील सर्व आखाती देश भारताविरोधात नाराज आहेत. यात कतार, इराण, कुवैत, सौदी अरेबिया, बहरीन, अफगाणिस्तान, संयुक्त भरब अमिराती, मालदिव, जॉर्डन, पाकिस्तान इत्यादी देश भारतावर नाराज असल्याचं सामनातून म्हटलंय. (Saamana Editorial News)

भारताच्या पंतप्रधानांचा फोटो कतार देशात कचरा कुंडीवर लावण्यात आला आहे, हे अमान्य असल्याचं शिवसेनेने सामनातून म्हटलंय. तसेच इस्लामी देशात भारतीय मालावर बहिष्कार टाकण्यात येत आहे यावरही भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने उत्तर दिलेलं नाही. भाजपच्या प्रवक्त्यांमुळे नेपाळ आणि भुतानसारख्या राष्ट्रांनी भारताला शहाणपणा शिकवण्याचा प्रयत्न केला आहे अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

भारतासारख्या अण्वस्त्रसज्ज देशाला कतार आणि मालदिवसारखे देश गुरगुरत आहेत अशीही वेळ कधी देशावर येईल असं वाटलं नव्हतं. कतार, कुवैतच्या दौऱ्यावर असलेले भारताच्या उप राष्ट्रपतींचे अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. ही वेळ देशावर केवळ भाजपच्या कर्माने आली असा गंभीर आरोप सामनातून भाजपवर करण्यात आला आहे.

Shivsena Slams BJP, Nupur Sharma News
Uddhav Thackeray : आज CM ठाकरेंची तोफ धडाडणार; औरंगाबादच्या नामांतराची घोषणा?

भाजपला हिंदु-मुस्लिमांचं राजकारण करुन आगी लावायच्या आहेत असा आरोप सामनातून करण्यात आला आहे. भाजप नेतेही हिंदु-मुस्लिमांत आगी लावतात, त्यांचे राजकाराण हिंदुत्वाचे नसून द्वेषावर आधारीत आहे असा गंभीर आरोपही सामनातून करण्यात आला आहे. तसेच आता प्रकरण अंगाशी आल्याने आम्ही निधर्मीच आहोत, आम्ही सर्व धर्मांचा सन्मान करतो असं ओरडून सांगण्याची वेळ भारताच्या परराष्ट्र मंत्रालयावर आली आहे असा टोलाही सामनातून केंद्र सरकार आणि भाजपला लगावण्यात आला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com