Delhi High Court Saam Tv
देश विदेश

Delhi High Court: दिल्ली हायकोर्ट बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिस अलर्ट मोडवर; संपूर्ण परिसर केला रिकामा

Delhi Police: दिल्ली हायकोर्टात बॉम्ब ठेवण्यात आला असल्याचा धमकीचा मेल दिल्ली पोलिसांना आला आहे. या धमकीनंतर दिल्ली पोलिस सतर्क झाले आहेत. दिल्ली हायकोर्ट रिकामे करण्यात आले असून पोलिस तपास करत आहेत.

Priya More

Summary -

  • दिल्ली हायकोर्टात बॉम्ब ठेवण्याची धमकी मेलद्वारे मिळाल्यानंतर परिसर रिकामा करण्यात आला.

  • तीन न्यायालयीन खोल्यांमध्ये स्फोट घडवण्याची धमकी मिळाल्याने पोलिस अलर्ट मोडवर आले आहेत.

  • बॉम्ब निकामी पथक आणि पोलिस घटनास्थळी तपास करत आहेत.

  • सीसीटीव्ही फुटेज तपासून हल्लेखोरांचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दिल्लीतील नामांकित शाळा बॉम्बस्फोट करून उडवून देण्याची धमकी ताजी असतानाच आता दिल्ली हायकोर्टात बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली आहे. दिल्ली हायकोर्टात बॉम्ब ठेवला असल्याच्या धमकीचा मेल दिल्ली पोलिसांना आला होता. या धमकीनंतर दिल्ली हायकोर्ट रिकामे करण्यात आले आह. त्याचसोबत हायकोर्टाचा परिसर देखील तात्काळ रिकामा करण्यात आला आहे.

दिल्ली हायकोर्टात बॉम्ब ठेवला असल्याची धमकी देण्यात आल्यानंतर पोलिस सतर्क झाले आहेत. हायकोर्टाच्या परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. हायकोर्टाच्या न्यायाधिश आणि वकिलांसह सर्व जणांना परिसरातून बाहेर जाण्यास सांगण्यात आले आहे. या धमकीमुळे एकच गोंधळ उडाला. दिल्ली पोलिस आणि बॉम्ब निकामी करण्यासाठी पथके दिल्ली हायकोर्टात दाखल झाली आहेत.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी पोलिसांना मेलद्वारे दिल्ली हायकोर्ट बॉम्बद्वारे उडवण्याची धमकी दिली आहे. दिल्ली हायकोर्टाच्या ३ न्यायालयीन खोल्यांमध्ये स्फोट घडवून आणण्याची धमकी पोलिसांना मिळाली आहे. रात्री ११ वाजताच्या सुमारास माहिती हा धमकीचा मेल आला. धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हल्लेखोरांनी २ वाजेपर्यंत हायकोर्ट रिकामे करण्याची धमकी दिली आहे. या धमकीनंतर हायकोर्टात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांकडून तपासले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शिंदे गटाकडून भाजपला 'दे धक्का', बड्या नेत्याचा पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह शिंदेसेनेत प्रवेश

Printed Kurta Sets: कम्फर्टेबल फिटींग आणि स्टायलिश लूकसाठी आजच 'हे' प्रिंटेड कुर्ता सेट ऑर्डर करा

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात

Election : यंदा गुलाल कुणाचा? पंचायत समिती सभापती, उपसभापतीचे आरक्षण जाहीर, वाचा यादी

Skin Care Tips: बटाटा त्वचेवर लावल्याने होतील 'हे' साइड इफेक्ट्स, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT