Delhi Crime: पेशंटकडून महिला रुग्णावर लैंगिक अत्याचार, पीडितेचा मृत्यू; रुग्णालयात काळीमा फासणारी घटना

Woman physical Assaulted by Patient: दिल्लीतील रुग्णालयात बेशुद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार; उपचारादरम्यान मृत्यू. आरोपीला अटक. या भयानक घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली असून पोलिसांकडून तपास सुरू.
Delhi Shocking Crime
Delhi Shocking CrimeSaam TV News
Published On

राजधानी दिल्लीतून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर येत आहे. रूग्णालयात बेशुद्ध अवस्थेत असलेल्या महिलेवर त्याच वॉर्डमध्ये दाखल असलेल्या पुरूष रूग्णाने लैंगिक अत्याचार केला आहे. या घटनेमुळे पीडित महिलेची प्रकृती अधिक चिंताजनक झाली. बुधवारी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी तपास करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या भयानक घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

ही संतापजनक घटना नॉर्थ ईस्ट दिल्लीतून समोर येत आहेत. एका ठिकाणी पीडित महिला बेशुद्ध आणि दारूच्या नशेत आढळली. स्थानिक लोकांनी तिला तातडीने रूग्णालयात नेलं. तरूणीला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केल्यानंतर बाकीचे लोक घरी परतले. ज्या वॉर्डमध्ये तरूणीला उपचारासाठी दाखल केली होती, त्या ठिकाणी फैज नावाच्या तरूणालाही उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

Delhi Shocking Crime
Maharashtra: 'सकाळी राज ठाकरेंचा फोन आला अन्..' मोर्चासंदर्भात नेमकं काय ठरलं? राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी

फैजने मध्यरात्री तरूणीवर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, बुधवारी तरूणीचा मृत्यू झाला. यानंतर मृत पीडितेच्या कुटुंबाने रूग्णालयात धाव घेतली. तरूणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती मिळताच त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी केली.

या प्रकरणाची माहिती देताना डीसीपी आशिष मिश्रा म्हणाले, तरूणीच्या मृत्यूनंतर वॉर्डमधील काही रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी जबाब दिला. त्या दिवशी वॉर्डमध्ये दाखल असलेल्या एका पुरूष रूग्णाने तरूणीला आधी मारहाण केली. नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यानंतर तरूणीला जेटीबी रूग्णालयात दाखल करण्यात आलं.

Delhi Shocking Crime
Car Romance: महामार्गावर कपलचा खुल्लमखुल्ला रोमान्स, कारच्या सनरूफवर उभं राहून लिपलॉक; VIDEO तुफान व्हायरल

दरम्यान, उपचार घेत असतानाच तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी मोहम्मद फैज या संशियत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. फैज कच्छी खजुरी येथील रहिवासी असून, त्याची चौकशी सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत तरूणीचे खरे कारण समोर येईल. त्यानंतर पुढील करावाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com