Court News
Court News Saam Digital
देश विदेश

Court News: दीर्घकाळ शारीरिक संबंध नाकारणे ही क्रूरताच.... काय म्हणाले दिल्ली उच्च न्यायालय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Court News

पती-पत्नीमधील किरकोळ वाद किंवा एकमेकांवर विश्वास नसणे याला मानसिक क्रूरता म्हणता येणार नाही. शारीरिक संबंधांना नकार देणे हा मानसिक क्रौर्याचा प्रकार मनाला जाऊ शकतो, मात्र तो ही सतत, जाणीवपूर्वक आणि बऱ्याच काळासाठी असेल तरच, अशी टिप्पणी दिल्ली उच्च न्यायालयाने पत्नीची याचिका मान्य करताना केली आहे.

कौटुंबिक न्यायालयाने, मानसिक क्रौर्याच्या आधारावर घटस्फोटासाठी पतीचा अर्ज मंजूर केला होता. याविरोधात महिलेने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायाधीश संजीव सचदेव आणि मनोज जैन यांच्या खंडपीठाने कौटुंबिक न्यायालयाचा या निर्णयाला असहमती दर्शविली.

पत्नीला सासरच्या घरी राहण्यात रस नसून पतीने आपल्या माहेरच्या घरी घर जावई म्हणून राहावे, अशी तिची इच्छा असल्याचा आरोप पतीने केला होता. दोघांनी १९९६ मध्ये हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केले. १९९८ मध्ये त्यांना मुलगी झाली. मात्र पतीने दावा करताना, त्याची पत्नी त्याला कोणत्या ना कोणत्या कारणाने एकटे सोडत असे. ती एक कोचिंग सेंटर चालवत होती आणि तिला ते चालवण्यात रस होता. पत्नीने आपल्यासोबत शारीरिक संबंध ही ठेवण्यास नकार दिल्याचा आरोप केला होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या प्रकरणात टिप्पणी करताना न्यायालयाने, शारीरिक संबंधांना नकार देणे हा मानसिक क्रूरतेचा प्रकार मानला जाऊ शकतो, मात्र हा नकार सतत, जाणीवपूर्वक आणि अधिक काळासाठी असेल तरच ती मानसिक क्रूरता मानली जाऊ शकेल. संवेदनशील आणि नाजूक विषय हाताळताना न्यायालयानेही अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. लग्न योग्य पद्धतीने झाले असेल तर असे आरोप केवळ अस्पष्ट विधानांच्या आधारे सिद्ध केले जाऊ शकत नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Marathi News: नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणूक; किशोर दराडेंना १७७५ मतांची आघाडी

Astro Tips: कर्जमुक्त होण्यासाठी सकाळी करा सोप्या टिप्स करा फॉलो

Aditi Rao Hydari : तुझं रूप हे नक्षत्राचं जनु बहरल्या रानाचं... आदिती रावचं मनमोहक सौंदर्य

Anant-Radhika Wedding: अंबानीची होणारी सून राधिका मर्चंट किती शिकलीये?

Weightloss Tips: झटपट वजन कमी करण्यासाठी झोपण्यापूर्वी करा 'या' ५ गोष्टी

SCROLL FOR NEXT