Delhi shaken again after Red Fort car blast incident : राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा स्फोट सदृश्य घटना घडल्याचे वृत्त समोर आले आहे. महिपालपूरमध्ये रेडियन्स हॉटेलजवळ ही घटना घडल्याचे समोर आले. ९ वाजण्याच्या आसपास या परिसरातून अग्निशामन दलाला फोन आल्याची माहिती मिळाली आहे. रेडियन्स हॉटेलजवळ स्फोटासारखा आवाज झाल्याचे स्थानिकांनी सांगितेलय. तीन दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीमधील लाल किल्ल्याजवळ कारमध्ये ब्लास्ट झाल्याची घटना ताजी असतानाच आणकी एका स्फोटाच्या आवाजाने दिल्ली हादरली आहे.
रेडियन्स हॉटेलजवळ ही घटना घडली असून अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. राजधानी दिल्लीतील महिपालपूर परिसरात स्फोटासारखा आवाज ऐकू आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.
सकाळी सव्वा नऊ वाजता महिपालपूर भागातून एका महिलेचा अग्निशामन दलाला स्फोटाच्या आवाजासंदर्भात फोन आला. अग्निशामन दलाला फोन आल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. तीन दिवसांपूर्वीच लाल किल्ल्याजवळ कार ब्लास्ट झाल्याने दिल्ली आधीच सतर्क आहे. स्फोटाच्या आवाजाची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनीही महिपालपूर भागाकडे धाव घेतली आहे. दिल्ली पोलीस, अग्निशामन दल घटनास्थळी पोहचले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिपालपूरमधील हॉटेल रेडियन्स परिसरात दिल्ली पोलिसांना काहीही संशयास्पद वस्तू अथवा व्यक्ती आढळला नाही. पोलिसाकंडून परिसरात तपास करण्यात येत आहे. याबाबत पोलिसांनी सांगितलं की, DTC बसचा टायर फुटल्याने जोरात आवाज झाल्याचे येथील गार्डने सांगितले. परिसरातील लोकांमध्ये पॅनिकची कोणतीही परिस्थिती नाही. दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी संध्याकाळी आय २० कारमध्ये स्फोट झाला होता. यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला. या स्फोटाच्या घटनेनंतर दिल्लीसह देशातील अनेक शहरात हाय अलर्ट जारी कऱण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.