आमदार मंदा म्हात्रेंना हृदयविकाराचा झटका
अपोलो रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया
दोन स्टेंट बसवण्यात आले
सध्या प्रकृती स्थिर
Navi Mumbai Belapur BJP Manda Mhatre Heart Attack बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांना काल रात्री २ :30 च्या सुमारास हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची बातमी समोर आली आहे. प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल मध्यरात्री आमदार मंदा म्हात्रे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने नवी मुंबईतील नामांकित अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्वरित तपासणी करून त्यांच्यावर रात्रीच शस्त्रक्रिया केली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती त्यांचे सुपुत्र निलेश म्हात्रे यांनी दिली आहे.
शस्त्रक्रियेदरम्यान आमदार मंदा म्हात्रे यांच्या शरीरात दोन स्टेंट बसवण्यात आल्या आहेत. शस्त्रक्रियेनंतर आमदार म्हात्रे यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
अचानक घडलेल्या या घटनेमुळे नवी मुंबईतील राजकीय व सामाजिक वर्तुळात चिंतेचे वातावरण पसरले आहे. मंदा म्हात्रे या नवी मुंबईतील एक प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. बेलापूर मतदारसंघातून त्या विधानसभेत प्रतिनिधित्व करत असून, स्थानिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या आमदार म्हणून त्यांची प्रतिमा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.