Arvind Kejriwal yandex
देश विदेश

Arvind Kejriwal: राज्यपाल की राष्ट्रपती? कोणती ऑफर मिळाली? ऐन निवडणुकीत केजरीवालांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर नेम

Delhi Election 2024: आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. निवडणूक आयुक्त राजीव कुमार भाजपसमोर शरण गेले असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

Bhagyashree Kamble

दिल्लीतील विधानसभेची निवडणूक संपूर्ण देशभरात चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय ठरते. पुन्हा एकदा चौथ्या टर्मसाठी केजरीवाल आणि त्यांचा पक्ष निवडणुकाच्या आखाड्यात उतरला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीला अवघे २ दिवस उरलेले असताना आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. निवडणूक आयुक्त राजीव कुमार भाजपसमोर शरण गेले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल यांनी मुख्य निवडणूक आयुक्त यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपसमोर मुख्य निवडणूक आयुक्तांनी हात टेकले आहेत. निवृत्तीनंतर त्यांना कोणत्या पदाची ऑफर देण्यात आली आहे? राज्यपाल की राष्ट्रपती? मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना हात जोडून विनंती करतो, आपले कर्तव्य पार पाडा, पदाची लालसा सोडून द्या, देशाची लोकशाही उद्ध्वस्त करू नका', अशी विनंती त्यांनी केली आहे.

पदाची लालसा सोडा, कर्तव्य पार पाडा

'मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाला शरण गेले आहे, त्यावरून असे वाटते की निवडणूक आयोगच अस्तित्वात नाही. पदाच्या लालसेपोटी त्यांनी देशातील लोकशाही गहाण ठेवली आहे', असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.

ते म्हणाले, 'राजीव कुमार या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होत आहेत. मी राजीव कुमार यांना हात जोडून विनंती करतो. आपले कर्तव्य पार पाडा. पदाची लालसा सोडून द्या. आता कारकि‍र्दीच्या शेवटच्या टप्प्यावर आहात, देशाची लोकशाही उध्वस्त करू नका', अशी विनंती अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime News: मालाडमध्ये बार डान्सरची हत्या; नको त्या अवस्थेत सापडला मृतदेह, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: पुण्यातील अजित पवारांच्या उपस्थितीत कात्रज दूध डेअरी मध्ये सर्वसाधारण सभेचे आयोजन

Navratri Festival : नवरात्रीची अनोखी परंपरा; कडक उपवासात ९ दिवस बसायचं नाही, झोपायच पण तेही उभं राहून

IND vs SL: श्रीलंकेविरूद्ध टीम इंडियामध्ये ३ बदलांची शक्यता; फायनलपूर्वी 'या' खेळाडूंना मिळणार संधी, पाहा कशी असेल प्लेईंग 11

Devoleena Bhattacharjee: गोपी बहूचे बेबी बंप फोटो व्हायरल; चाहत्यांना देणार पुन्हा गोड बातमी?

SCROLL FOR NEXT