दिल्ली : दिवाळीच्या रात्रीच दिल्ली हादरली. दिवाळीच्या रात्री काका-पुतण्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन्ही काका-पुतण्याच्या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या दोन्ही काका-पुतण्याच्या हत्येचं कारण समोर आलं आहे.
पोलीस अधिकारी प्रशांत गौतम म्हणाले, 'मृत आकाशने अल्पवयीन आरोपीला काम सोपवलं होतं. या कामासाठी ७० हजार रुपये ठरले होते. काम पूर्ण झाल्यानंतर आकाश त्याचे पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. त्यानंतर आकाश आरोपीचा फोन देखील उचलत नव्हता. यामुळे अल्पवयीन आरोपी खूप रागात होता. हाच राग मनात ठेवून त्याने एका सांगून दिवाळीच्या दिवशीच आकाशची हत्या केली.
१७ दिवसांआधी रचला होता हत्येचा कट
आरोपीच्या टार्गेटवर फक्त आकाश होता. मात्र, आकाशचा पुतण्या चुकून मारला गेला. काकांवर गोळ्या झाडल्यानतंर त्यांचा पुतण्या आरोपींना पकण्यासाठी धावला. शुटरला पैसे देण्यासाठी अल्पवयीन आरोपीने हत्येचा कट १७ दिवसांपूर्वी रचला होता. अल्पयवयीन आरोपीने या आधी अनेक गुन्ह्यात सहभाग नोंदवला आहे.
दिल्लीतील शाहदरा या भागात एक कुटुंब दिवाळी साजरी करत होतं. त्याचवेळी बंदुकधारी दोघे आले. या आरोपींनी एका ४० वर्षीय व्यक्तीवर आणि त्याच्या १६ वर्षीय पुतण्याची गोळ्या झाडून हत्या केली. तर या घटनेत या व्यक्तीचा १० वर्षीय मुलगा जखमी झाला आहे. या घटनेनंतर काही वेळातच अल्पवयीन आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेतील शूटरचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन आरोपीने हत्या करण्याचा कट रचला होता. या आरोपीने शूटरला पैसे मोजले होते. या शूटरने दिवाळीच्या रात्रीच काका-पुतण्याची हत्या केली. आकाशने आरोपीला एक काम सोपवलं होतं. मात्र, त्याचे काम केल्यानंतर तो पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. त्यामुळे आकाशने त्याच्या हत्येचा कट रचला.
दिवाळीच्या दिवशीचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. पिवळ्या कुर्त्यात ४० वर्षीय आकाश आणि १६ वर्षीय पुतण्या ऋषभ फटाके फोडत होते. तर त्यांचा १० वर्षीय कृष हा दरवाज्यात उभा होता. यावेळी दोन लोक स्कुटीवर आले. दुसरा व्यक्ती स्कुटीवर खाली उतरला. त्यानंतर त्याने बंदूक काढून थेट आकाशवर गोळ्या झाडल्या.
एक गोळी कृषला चाटून गेली. या संपूर्ण घटनेनंतर ऋषभ त्यांच्या मागे धावू लागला. त्यानंतर या शुटरने ऋषभवर गोळ्या झाडल्या. या घटनेत दोन्ही काका-पुतण्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक केली आहे. पोलिसांकडून शुटरचा शोध सुरु आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.