Pune Crime News : पुण्यात दिवाळीची लगबग अन् चोरट्यांची ‘चांदी’; घरफोड्या आणि चोरीच्या घटना सुरूच

Crime News : पुण्यात चोरीच्या अनेक घटना घडत आहे. बाजारात नागरिक खरेदीसाठी आल्यावर त्यांच्या गळ्यातील चैन, पाकीट अशा वस्तूंवर डल्ला मारला जात आहे.
Crime News
Pune Crime NewsSaam TV
Published On

पुणे शहरात घरफोड्या आणि चोरीच्या घटना सुरूच आहेत. बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांकडून बंद सदनिकांमध्ये घरफोडी, तर गर्दीत महिलांचे दागिने चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दिवाळी सणानिमित्त बाजारात दागिने, कपडे खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू असताना ही घटना घडली आहे.

Crime News
Pune Crime News: पुण्यात चाललंय काय? कोयता गँगचा काँग्रेसच्या बड्या नेत्यावर जीवघेणा हल्ला, थोडक्यात जीव वाचला

याच गर्दीचा फायदा घेत चोरटे महिलांच्या दागिन्यांवर डल्ला मारत आहेत. शिवाजीनगर, वाकडेवाडी बसस्थानकातही गर्दीचा फायदा घेत चोरीच्या घटना घडत आहेत.

मागील चार दिवसांतील पुणे शहरातील काही घटना

तुळशीबाग येथे पिरंगुटमधील महिलेच्या लहान मुलाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी.

टिळेकरनगरमध्ये खरेदी करून घरी निघालेल्या महिलेचे दीड तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले.

शनिवार चौकात जांभूळवाडीतील महिलेच्या पर्समधून सव्वा लाखांचे सोन्याचे ब्रेसलेट चोरी.

स्वारगेट बसस्थानक याठिकाणी बसमध्ये चढताना पिंपळ निलखमधील महिलेचे ६८ हजारांचे दागिने लंपास.

चंदननगर भागात साडीच्या दुकानात खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून ८७ हजारांचे दागिने, रोकड चोरी.

पुण्यात दिवाळी उत्सवाचा गाजावाजा सुरू आहे. दिवाळीत प्रत्येक व्यक्ती सोने खरेदीसह, नवीन कपडे आणि महागड्या वस्तूंची खरेदी करतात. मात्र बाजारात सध्या चोरांच्या अनेक टोळ्या सक्रिय झाल्यात. त्यामुळे स्वत:ची आणि स्वत:च्या सामानाची काळजी घेत नागरिकांनी खरेदी केली पाहिजे.

खरेदीला जाताना ही काळजी घ्या

रस्त्यावर बाजारात फिरताना महागडे दागिने परिधान करू नका.

शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.

महिलांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना गळ्यात महागडं मंगळसूत्र घातलं असेल तर ते ओढणी किंवा साडीच्या पदराने झाकून घ्या.

पर्सची काळजी घेताना शक्यतो पर्स स्वत: जवळ ठेवा.

चैन नसलेल्या पिशवीत पाकीट किंवा मौल्यवान वस्तू ठेवल्या असतील तर त्या हातात घट्ट धरा. शक्यतो पोटाशी ठेवा.

Crime News
Pune Crime: हृदयद्रावक! आधी फासावर लटकवलं, नंतर श्वानावर गोळ्या झाडल्या; पुण्यातील धक्कादायक प्रकार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com