Pune Police: पुण्यात नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी जप्त केलं १३८ कोटी रुपयांचं सोनं

Pune Police: पुण्यातील सहकारनगरमध्ये नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी १३८ कोटी रुपयांचं सोनं जप्त केलं आहे.
Pune Police Seized Gold
Pune Police Seized Gold
Published On

पुण्यात नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी १३८ कोटी रुपयांचं सोने जप्त केले आहे. पुण्यातील सहकारनगर भागात नाका बंदी असताना पोलिसांनी ही कारवाई केलीय. पोलिसांनी यासंदर्भात निवडणूक अधिकारी आणि आयकर विभागाला माहिती कळवली आहे. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशात या निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडाव्यात यासाठी निवडणूक आयोग सतर्क आहे. याचदरम्यान पुण्यात नाकाबंदी दरम्यान पोलिसांना १३८ कोटी रुपायांचे सोने सापडले आहे. प्राथमिक माहितीनुसार, डिलिव्हरी ट्रान्सपोर्टची असण्याची शक्यता आहे.

पुणे पोलिसांनी आज नाकाबंदी दरम्यान एक टेम्पो पकडला त्यात १३८ कोटी रुपये किमतीचे सोने आढळून आले. सहकारनगर परिसरातून ताब्यात घेतलेला हा टेम्पो एका खासगी लॉजिस्टिक कंपनीचा असून यामधील सोनं पुण्यातील कुठल्या व्यापाऱ्याकडे जात होतं, याचा तपास सध्या सुरू असून पोलिसांनी या संदर्भात सगळी माहिती आयकर विभाग तसेच निवडणूक आयोगाला कळवलेली आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागोजागी पोलिसांकडून नाकाबंदी केली जाते. या नाकाबंदी दरम्यान पोलिसांना एका टेम्पोमध्ये तब्बल १३८ कोटी रुपयांचं सोनं आढळून आले. हा टेम्पो व्यापाऱ्याचा असून तो लॉजिस्टिक असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या दिवाळीची लगबग सुरू आहे. या सणावेळी सोन्याला मोठी मागणी असते. त्यावेळी लॉजिस्टिक म्हणजेच गोडाऊनवरून सोनं व्यापाऱ्यांकडे नेलं जातं त्यामुळे हा टेम्पो व्यापाऱ्याचा आहे का? कोठून हा टेम्पो निघाला होता आणि कुठे जात होता याचा तपास केला जात आहे.

नाकाबंदीवेळी कारमधून लाखोंची कॅश जप्त

आचारसंहिता काळात कुठलाही गैरव्यवाहार होऊ नयेत यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. प्रत्येक शहरातील नाक्यावर वाहनांची तपासणी केली जातेय. या नाकाबंदी दरम्यान पुण्यातील खेड-शिवापूर परिसरात एका गाडीतून जवळपास 5 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. संबंधित गाडी ही सत्ताधारी आमदाराची असल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर पुण्यातील हडपसर सोलापूर रोडवर एका गाडीत २२ लाख रुपये सापडले. ही रक्कम किराणामाल दुकानदाराची असल्याचं सांगितलं जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com