Delhi News Today ANI
देश विदेश

Delhi Murder Case: "कोणताही पश्चाताप नाही, ती मला इग्नोर करायची म्हणून..." साहिलने प्रेयसीच्या हत्येची दिली कबुली

Delhi News Today: ही घटना सीसीटीव्हीत कैद असून या सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Shivani Tichkule

Delhi Crime News: दिल्लीच्या शाहबाद डेअरी (Shahbad Dairy) येथे राहणाऱ्या16 वर्षीय मुलीची अतिशय निर्दयीपणे हत्या करण्यात आली. तरुणीची हत्या करणाऱ्या तिच्या बॉयफ्रेंड साहिलला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. साहिलला दिल्ली पोलिसांनी बुलंदशहरातून अटक केली आहे. तरुणीने त्याच्यासोबत अचानक बोलणं बंद केल्यामुळे साहिलने तिची हत्या केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली. (Latest Marathi News)

साहिलने पोलीस चौकशीत सांगितले की, त्याला त्याच्या कृत्याबद्दल कोणताही पश्चाताप नाही. अनेक दिवसांपासून तरुणी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे त्याने सांगितले. दिल्लीतील शाहबाद डेअरीमध्ये सोमवारी (29 मे) एका 16 वर्षीय मुलीची चाकूने निर्घृण हत्या करण्यात आली. तिच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. एवढ्यावरही मारेकरी थांबला नाही आणि त्याने दगड उचलून मुलीच्या डोक्यात वार केले. (Delhi Crime News)

हत्येची भीषण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. घटनेच्या दिवशीच दिल्ली पोलिसांनी आरोपीला उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून अटक केली होती. साहिल असे आरोपीचे नाव आहे. तो एसी आणि फ्रीज दुरुस्तीचे काम करतो.

पोलिसांनी सांगितले की, 'तरुणी आणि आरोपी साहिल दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. मात्र शनिवारी दोघांमध्ये काही कारणावरून भांडण झाले. याचाच राग मनात ठेवून आरोपीने हे कांड केलं. तरुणीच्या हत्येमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

पोलिसांच्या चौकशीत दिली गुन्ह्याची कबुली

अटकेनंतर दिल्ली पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. साहिलने पोलिसांना सांगितले की, ते दोघेही रिलेशनशिपमध्ये होते आणि त्याला कोणताही पश्चाताप नाही. तो म्हणाला की मुलगी अनेक दिवस त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती, तिला माझ्यासोबतचे नाते संपवून तिच्या जुन्या प्रियकराकडे जायचे होते यावरून साहिलला खूप राग आला आणि त्याने तरुणीची हत्या केली.

पुढे चौकशीदरम्यान साहिलने सांगितले की, हत्येनंतर तो रिठाळा येथे गेला आणि तेथे त्याने खुनात वापरलेला चाकू लपवून ठेवला. यानंतर साहिल बुलंदशहरला गेला. बुलंदशहरला जाण्यासाठी त्यांनी दोनदा बस बदलली. पण पोलिसांनी (Police) त्याला पकडले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिलने हत्येनंतर त्याचा फोन बंद केला होता, जो जप्त करण्यात आला आहे.

साहिल एकाच वेळी अनेक मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये होता. पीडितेला याची माहिती मिळाली होती आणि त्यामुळेच तिने साहिलपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर साहिलने पीडितेला मारण्याचा कट रचला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यातील रिंग रोड आणि महामार्गांना अजित पवारांचे नाव द्या,रोहित पवारांची मागणी

Success Story: कॅन्सर-पॅरेलिसिसला हरवले, ४ सर्जरीनंतरही हरला नाही, ३८व्या वर्षी UPSCत यश; संजय डहरिया यांचा प्रवास

Iran Israel Conflict : इराणच्या एका क्षेपणास्त्रात ८० बॉम्ब, इस्रायलवर मोठा प्रहार, क्लस्टर बॉम्ब नेमका काय आहे?

Zumba: वजन कमी करण्यासाठी झुंबा खरचं फायदेशीर आहे का?

SSC Exam : बोर्डाच्या कॉपीमुक्त परीक्षा मिशनचा फज्जा, दहावीचा पेपर ३ दिवस आधीच फोडला

SCROLL FOR NEXT