Shreya Maskar
आता लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे. श्रावण सुरू होण्याआधी अनेकांच्या घरात गटारी अमावस्या केली जाते. तेव्हा झणझणीत कोंबडी वडे बनवा.
गटारी किंवा गटारी अमावस्या म्हणजे आषाढ महिन्याची शेवटची अमावस्या होय. पवित्र श्रावण मास सुरू होण्यापूर्वी येणाऱ्या या दिवशी मांसाहार, मद्याचा आस्वाद घेण्याची प्रथा आहे.
मालवणी स्टाइल कोंबडी वडे बनवण्यासाठी वड्याची भाजणी, तांदूळ, गव्हाचे पीठ, चणा डाळ,उडीद डाळ, धणे, हळद, मीठ, तेल, मसाला, जिरे, बडीशेप, मेथी दाणे इत्यादी साहित्य लागते.
कोंबडी वडे बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात तांदळाचे पीठ, गव्हाचे पीठ, चणा डाळ, उडीद डाळीचे पीठ एकत्र करा. त्यात मीठ, हळद आणि मसाला घालून मिक्स करा.
पीठात हळूहळू कोमट पाणी टाकून मऊ कणिक मळून घ्या. त्याला थोडे तेल लावून गुळगुळीत करा. कणकेचे लहान आकाराचे गोळे बनवा.
प्लास्टिकच्या शीटला तेल लावा आणि कणकेच्या गोळ्याला हाताने थापून वड्याचा आकार द्या. लक्षात ठेवा पीठ जास्त पातळ आणि घट्ट होणार नाही याची काळजी घ्या.
आता एका कढईत तेल गरम करून वडे दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी आणि फुगेपर्यंत तळून घ्या. वडे तळताना गॅस कमी आचेवर ठेवून द्या.
अशाप्रकारे गरमागरम कोंबडी वडे मालवणी चिकन करीसोबत सर्व्ह करा. येणाऱ्या रविवारी कोंबडी वड्यांचा बेत आखा.