Shreya Maskar
रिमझिम पावसामुळे वातावरण थंड होते. अशात शरीराला ऊब मिळावी म्हणून आपण गरमागरम चहा पितो. एकदा पावसाळ्यात पहाडी मसाला चहा नक्की ट्राय करा.
पहाडी मसाला चहा हिमालयीन मसाल्यांसाठी, मातीचा सुगंध आणि ताजी तुळशी आणि पुदीना यांसारख्या औषधी वनस्पतींसाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
पहाडी मसाला चहा बनवण्यासाठी पाणी, आले, तुळशीची पाने, पुदिन्याची पाने, लवंगा, वेलची, काळ्या चहापत्तीची पाने, गूळ इत्यादी साहित्य लागते.
पहाडी मसाला चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम आले, तुळस, पुदिना, लवंगा आणि वेलची खलबत्त्यात वाटून घ्या.
एका भांड्यात पाणी घालून त्यात वाटलेले मसाले घाला. मंद आचेवर उकळी आणा. उकळी आल्यावर, काळ्या चहापत्तीची पाने घाला आणि २ मिनिटे शिजू द्या.
त्यानंतर चहामध्य दूध घाला आणि २ मिनिटे उकळा. चवीनुसार गूळ घाला. गॅस बंद करा आणि गूळ विरघळेपर्यंत ढवळा. अशाप्रकारे पहाडी मसाला चहा तयार झाला.
कधीकधी गरम चहामध्ये गूळ घातल्याने तो फाटू शकतो. ही समस्या टाळण्यासाठी आधी चहा गाळून घ्या आणि नंतर गुळाची पावडर वापरून तो गोड करा.
तुम्ही चहा गोड करण्यासाठी गुळाऐवजी साखर देखील वापरू शकता. हा चहा अवघ्या ५-१० मिनिटांत बनून तयार होतो.