Chicken Rate in Maharashtra: चिकनप्रेमींसाठी वाईट बातमी; महाराष्ट्रासह देशात चिकनच्या दरात मोठी वाढ

Maharashtra Chicken Price Today: तुम्ही जर चिकनप्रेमी असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण, महाराष्ट्रासह देशात चिकनच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
Chicken Price in Maharashtra
Chicken Price in MaharashtraSaam TV

Chicken Price Hike in Maharashtra: तुम्ही जर चिकनप्रेमी असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण, महाराष्ट्रासह देशात चिकनच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे एक किलो चिकनचे दर २६० रुपयांवर पोहोचले आहेत. कोंबड्यांची आवक कमी आणि मागणी अधिक असल्याने ही दरवाढ झाल्याचं सांगितलं जातं आहे. (Latest Marathi News)

गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत देशासह राज्यात चिकनचे आताचे दर खूपच महाग आहे. बॉयलर चिकन तर सोडाच पण यामध्ये गावठी कोंबडीचं चिकन सुद्धा आणखी महाग झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात सातत्याने चढउतार होत आहे. याचा फटका पोल्ट्री व्यावसायिकांना देखील बसला आहे.

Chicken Price in Maharashtra
Maharashtra Weather Forecast: राज्यासाठी पुढचे २४ तास धोक्याचे; मुंबईसह या जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता

एकीकडे अतिउष्णतेमुळे कोंबड्यांचा मृत्यू होत आहे, तर दुसरीकडे या उष्णतेपासून बचावलेल्या कोंबड्यांच्या वजनात सुद्धा घट दिसन येत आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालं आहे. परिणामी बाजारात रविवारी (ता. २८) चिकनचे दर २६० रुपये किलोवर पोहोचले.  (Breaking Marathi News)

राज्यात पोल्ट्री व्यावसायिकांची संख्या जवळपास नऊ लाखांच्या घरात आहे. राज्यातील अनेक शेतकरी पूरक व्यवसाय म्हणून करारावर पोल्ट्री व्यवसाय करतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून चिकनचे दर दबावात असल्याने उत्पादकता खर्चाची भरपाई करणेदेखील पोल्ट्री व्यावसायिकांना शक्य होत नव्हते.

Chicken Price in Maharashtra
IPL 2023 Winner: धोनीची CSK पाचव्यांदा चँम्पियन; चेन्नईने ट्रॉफी जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सचं ट्विट

त्यामुळे देखील बाजारात स्थिरता आली होती. ८५ रुपये उत्पादकता खर्च असताना ७५ ते ८० रुपये किलोप्रमाणे चिकनची विक्री करण्याची वेळ पोल्ट्री व्यावसायिकांवर आली होती. गेले सहा महिने अशी स्थिती असल्यामुळे अनेकांनी उत्पादन कमी केले. आता उन्हाळ्यात ५० टक्के मागणी आणि ३० ते ४० टक्के उत्पादन अशी विरोधाभासी स्थिती निर्माण झाली आहे.

त्यामुळे दरात सुधारणा अनुभवली जात आहे. सध्या अमरावती बाजारपेठेत २६० रुपये किलो असा दर चिकनला मिळाला. येत्या काळाच चिकनचे दर 300 रुपये किलोवर जातील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा चिकप्रेमी असाल, तर तुम्हाला चिकनचे भाव जाणून घेणे गरजेचे आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com