Delhi Crime News Saam Tv
देश विदेश

Shocking : भयंकर! ५०० हून अधिक तरुणींचे खासगी व्हिडिओ अन् फोटो; व्हायरल करण्याची धमकी देऊन कोट्यवधींना लुटलं

Delhi Crime News : डेटिंग आणि मॅट्रिमोनियल अ‍ॅप्सच्या माध्यमातून ५०० हून अधिक तरुणींची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • ५०० हून अधिक तरुणी सायबर फसवणुकीच्या जाळ्यात

  • डेटिंग अ‍ॅपद्वारे प्रेमाचे आमिष दाखवून फसवणूक

  • खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी

  • पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक, तपास सुरू

सायबर फसवणूक झाल्याचे अनेक गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल होतात. कधी खरेदी करताना, कधी बनावट अ‍ॅप्सच्या माध्यमातून हे प्रकार घडतं आहेत. या विळख्यात सर्वात जास्त महिला अडकल्याची टक्केवारी आहे. अशातच आता एका तरुणाने ५०० हून जास्त तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत, त्यांचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपीला ताब्यात घेतले आहे. तसेच याप्रकरणात आणखी किती तरुणी अडकल्या आहेत? याचा तपास पोलीस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव आनंद कुमार (वय ३५) असे आहे, तो मूळचा पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्याचा रहिवासी आहे. आरोपी आनंदने अनेक तरुणींना डेटिंग अ‍ॅप्सच्या आणि मॅट्रिमोनिअल अ‍ॅप्सच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. लग्नाचे वचन देत, तो स्वतःची ओळख प्रत्येक तरुणीला वेगवगेळी सांगायचा. कधी डॉक्टर, वकील, व्यवसायिक, दिगदर्शक असल्याचं सांगत तरुणींना आपल्याकडे जास्त पैसा असल्याचं खोटं सांगायचा.

त्यानंतर तरुणी जाळ्यात अडकल्या की, आरोपी त्यांच्याकडून लाखो रुपये उकळायचा. तरुणींनी पैसे देण्यास नकार दिल्यास, त्यांचेच खासगी फोटो आणि व्हिडिओ दाखवून व्हायरल करण्याची धमकी द्यायचा. त्याच्या अशा धमक्यांना घाबरून तरुणींनी देखील आरोपीला पैसे दिले. धक्कादायक म्हणजे यानंतर त्याने स्वतःहून पीडित तरुणींना तो मेल्याचे सांगितले.

याप्रकरणी एका तरुणीने पोलीस ठाण्यात २ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीनंतर आनंद कुमारचे काळे धंदे जगासमोर उघडं झाले. याप्रकरणात ५०० हून अधिक तरुणींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. तसेच आरोपी अनेक बनावट नावांनी बँक खाती चालवत होता. त्याच्यावर दिल्ली आणि गाझियाबादमध्ये यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत. पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या सायबर चोराला बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस आता या प्रकरणात पुढील तपास आणि चौकशी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

West bengal CM Race: भाजपचं धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत मोठा ट्विस्ट, महिला नेत्या अचानक दिल्लीत धडकल्या

लग्नाआधी वजन घटवण्याचं औषध? दिखाव्याच्या दुनियेत आरोग्याशी खेळ

ममता दीदींकडून केंद्र सरकारची कोंडी, राजीनामा न दिल्यानं संघर्ष वाढणार?

Cricketer Death : पंजाब किंग्जच्या माजी क्रिकेटपटूचं ३७ व्या वर्षी निधन, क्रिकेटविश्वात शोककळा

पुण्यात 2000 झाडांची कत्तल होणार? 'ग्रीन कव्हर' धोक्यात, पुणेकरांचा संताप

SCROLL FOR NEXT