Delhi Blast Saam Tv
देश विदेश

Delhi Blast: लाल किल्ल्याजवळ भयंकर स्फोट, आतापर्यंत कधी अन् केव्हा स्फोटाने दिल्ली हादरली, वाचा...

Delhi Blast Upate: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ आज संध्याकाळी भयंकर स्फोट झाला. या स्फोटामुळे दिल्ली हादरली असून यामध्ये १० जणांचा मृत्यू तर ३० जण गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटापूर्वी दिल्ली कधी आणि किती वेळा हादरली वाचा सविस्तर...

Priya More

Summary -

  • दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ मोठा स्फोट झाला

  • लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ कारमध्ये हा स्फोट झाला

  • या स्फोटात १० जणांचा मृत्यू आणि ३० पेक्षा अधिक जखमी झालेत

  • आसपासच्या वाहनांना आणि दुकानांना आग लागून मोठे नुकसान झाले

भयंकर स्फोटाने आज दिल्ली हादरली. दिल्लीतील लाल किल्ल्या समोर एका कारमध्ये मोठा स्फोट झाला. लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट क्रमांक- १ जवळ ही घटना घडली. या स्फोटामुळे दिल्लीत भीतीचे वातावरण आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, आसपासचा संपूर्ण परिसर हादरून निघाला. या स्फोटामध्ये आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला तर ३० पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या स्फोटानंतर आसपासच्या वाहनांना भीषण आग लागली. त्याचसोबत आसपासच्या दुकानांना देखील आग लागली. हा स्फोट इतका भीषण होता की लाल किल्ल्याजवळ असणाऱ्या लाल मंदिरावर कारचा एक तुकडा उडून पडला. मंदिराच्या काचा फुटल्या आणि आसपासच्या दुकानांचे दरवाजे आणि खिडक्यांचे नुकसान झाले. दिल्लीतील चांदणी चौक परसिरातील भागीरथ पॅलेसपर्यंत स्फोटाचा हादरा जाणवला. दिल्लीमध्ये पहिल्यांदाच इतकी भयंकर घटना घडली. लाल किल्ला परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हा दहशतवादी हल्ला आहे की कारमध्ये असणाऱ्या गॅस सिलेंडरमध्ये स्फोट झाला याचा तपास सध्या सुरू आहे.

दिल्लीत आतापर्यंत कधी आणि केव्हा बॉम्बस्फोट झालेत -

- २५ मे १९९६ - लाजपत नगर सेंट्रल मार्केटमध्ये बॉम्बस्फोट - १६ जणांचा मृत्यू

- १ ऑक्टोबर १९९७ - सदर बाजाराजवळ दोन बॉम्बस्फोट - ३० जण जखमी

- १० ऑक्टोबर १९९७ - शांतीवन, कौडिया पूल आणि किंग्जवे कॅम्प परिसरात तीन स्फोट - एकाचा मृत्यू तर १६ जण जखमी

- १८ ऑक्टोबर १९९७ - राणी बाग मार्केटमध्ये दुहेरी स्फोट - एकाचा मृत्यू तर २३ जण जखमी

- २६ ऑक्टोबर १९९७ - करोल बाग बाजारात दोन स्फोट - एकाचा मृत्यू तर ३४ जण जखमी

- ३० नोव्हेंबर १९९७ - लाल किल्ला परिसरात दुहेरी स्फोट - ३ जणांचा मृत्यू तर ७० जण जखमी

- ३० डिसेंबर १९९७ - पंजाबी बागेजवळ बसमध्ये स्फोट - ४ जणांचा मृत्यू तर ३० जण जखमी

- १८ जून २००० - लाल किल्ल्याजवळ दोन शक्तिशाली स्फोट - २ जणांचा मृत्यू १२ जण जखमी

- १६ मार्च २००० - सदर बाजारात स्फोट - ७ जण जखमी

- २७ फेब्रुवारी २००० - पहाडगंजमध्ये स्फोट - ८ जण जखमी

- १४ एप्रिल २००६ - जामा मशिदीच्या परिसरात दोन स्फोट - १४ जण जखमी

- २२ मे २००५ - लिबर्टी आणि सत्यम सिनेमागृहात दोन स्फोट - एकाचा मृत्यू तर ६० जण जखमी

- २९ ऑक्टोबर २००५ - सरोजिनी नगर, पहाडगंज आणि गोविंदपुरी येथे ३ स्फोट - ५९ ते ६२ जणांचा मृत्यू तर १०० हून अधिक जखमी

- १३ सप्टेंबर २००८ - करोल बाग (गफ्फार मार्केट), कॅनॉट प्लेस आणि ग्रेटर कैलास-१ मध्ये ५ साखळी स्फोट - २० ते ३० जणांचा मृत्यू तर ९ पेक्षा अधिक जखमी

- २७ सप्टेंबर २००८ - मेहरौली फ्लॉवर मार्केट (सराई) येथे स्फोट - ३ जणांचा मृत्यू तर २३ जण जखमी

- २५ मे २०११ - दिल्ली हायकोर्टाच्या पार्किंगमध्ये स्फोट - कोणतीही जीवितहानी झाली नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime: कल्याणमध्ये चाललंय काय? नशेखोर तरुणांचा हैदोस, मराठी बोलता आलं नाही; परप्रांतीयांना बेदम मारहाण

Prem Chopra Hospitalised: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोपड़ा यांची प्रकृती बिघडली; मुंबईच्या रुग्णालयात दाखल

Delhi Blast : दिल्लीतील स्फोटामुळे खळबळ; देशाला हादरवणाऱ्या घटनेवर कोण काय म्हणाले?

Tuesday Horoscope : महत्वाची जबाबदारी अंगावर येऊन पडणार; ५ राशींच्या लोकांच्या हातून मोठं काहीतरी घडणार

Pune Accident : पुण्यात अपघाताचा थरार; कारने अनेक वाहनांना उडवलं, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

SCROLL FOR NEXT