Delhi Blast: दिल्लीत मोठा स्फोट, वाहनं पेटली; आग अन् धुराचे लोट; पाहा घटनेचा पहिला VIDEO

Delhi Blast First Video: दिल्लीमध्ये भयंकर घटना घडली. संध्याकाळच्या सुमारास लाल किल्ल्यासमोर एका कारमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे दिल्ली हादरली. स्फोट झाल्यानंतर अनेक वाहनांना आग लागली. या घटनेचा पहिला व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.
Delhi Blast: दिल्लीत मोठा स्फोट, वाहनं पेटली; आग अन् धुराचे लोट; पाहा घटनेचा पहिला VIDEO
Delhi Blast First VideoSaam Tv
Published On

Summary -

  • दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ मोठा स्फोट झाला

  • लाल किल्ल्यासमोर उभ्या राहिलेल्या कारमध्ये स्फोट

  • स्फोटानंतर अनेक वाहनं जळून खाक झाली

  • स्फोटाचा पहिला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली. लाल किल्ल्याच्या समोरच एका कारमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरला. ही घटना संध्याकाळी ६.५५ मिनिटांनी घडली. कारमध्ये स्फोट झाल्यानंतर अनेक वाहनांनी पेट घेतला. एकापाठोपाठ एक अशी अनेक वाहनं जळाली. सगळीकडे आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पसरले. या स्फोटाचा पहिला व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मदतकार्य सुरू केला आहे. या स्फोटामध्ये आठ जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले आहेत. लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाचा जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये घटनास्थळी असणारे सर्वजण इकडे तिकडे पळताना आणि किंचाळताना दिसत आहे. घटनास्थळी सध्या गोंधळाचे वातावरण आहे. स्फोट झाल्यानंतर अनेक जण गंभीररित्या जखमी झाले. जखमींना तात्काळ आसपासच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Delhi Blast: दिल्लीत मोठा स्फोट, वाहनं पेटली; आग अन् धुराचे लोट; पाहा घटनेचा पहिला VIDEO
Delhi Red Fort Blast: देशात खळबळ! दिल्लीत मोठा स्फोट, एकाचा मृत्यू|VIDEO

स्फोटामध्ये अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले असून अनेक वाहनं जळून खाक झाली आहेत. स्फोटामुळे घनटास्थळी वाहतूक कोंडी झाली आणि परिसरात भीतीचे वातावण पसरले आहे. पोलिसांनी सर्वांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला दित आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की परिसरात सगळीकडे धुराचे लोट पसरले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या, रुग्णवाहिका आणि पोलिसांच्या गाड्या आल्या आहेत. पोलिस, अग्निशमन दलाचे कर्मचारी बचावकार्यात गुंतले आहेत.

Delhi Blast: दिल्लीत मोठा स्फोट, वाहनं पेटली; आग अन् धुराचे लोट; पाहा घटनेचा पहिला VIDEO
Delhi Red Fort Blast : दिल्लीतील स्फोटात ८ जणांचा मृत्यू, हाय अलर्ट जारी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com