यात्रीगण कृपया ध्यान दे! देशभरात एअर इंडियाचं सर्व्हर डाउन; दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा

Air India Server Down: देशभरात एअर इंडियाचं सर्व्हर डाऊन झाल्यामुळे दिल्ली विमानतळावर लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे चेक-इनला विलंब होतोय. एअरलाइन ही समस्या सोडवण्यासाठी काम करत आहे, मात्र प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
Air India Server Down
Long queues at Delhi airport after Air India server crash; passengers wait for check-in clearance.saamtv
Published On
Summary
  • एअर इंडियाच्या सर्व्हरमध्ये एक दिवसापासून समस्या

  • देशातील सर्व विमानतळांवर एअर इंडियाचे सर्व्हर डाऊन

  • सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाला आहे.

देशभरात एअर इंडिया एअरलाइन्स सर्वर ठप्प पडलंय. त्यामुळे दिल्लीसह अनेक विमानतळांवर प्रवाशांची गैरसोय होतेय. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांच्या लांब रांगा लागल्या आहेत. सर्व्हर बिघाडामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दिल्ली विमानतळावरील एका अधिकाऱ्याने देशातील सर्व विमानतळांवर एअर इंडियाचे सर्व्हर डाऊन झाल्याची माहिती दिली आहे. लवकरच ही समस्या दुरुस्त केली जाईल, असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. दरम्यान एअर इंडियाच्या सर्व्हरमध्ये कालपासून समस्या येत आहेत.

Air India Server Down
Jalgaon-Mumbai Flight: आनंदाची बातमी! आता जळगाववरून दीड तासात मुंबई गाठा; जाणून घ्या विमान उड्डाणांचे वेळापत्रक
Air India Server Down
Plane Crash : उड्डाण घेताच विमान कोसळले, ४ जणांचा मृत्यू; काळाकुट्ट धूर अन् आगीचे उंच लोळ, थरारक व्हिडिओ व्हायरल

'दुपारी ३ वाजल्यापासून टर्मिनल २ मध्ये सर्व्हरमध्ये समस्य येऊ लागल्या आहेत. T2 वरून निघणारे प्रवासी वैतागले असून ते प्रशासकीय व्यवस्थापनाला दोष देत आहेत. विमानतळावरील एअर इंडियाच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाला आहे, यामुळे सामान खाली उतरण्यास अडथळा येतोय.

Air India Server Down
Flight Rules: गुड न्यूज! DGCA ने तिकिटासंदर्भात आणले नवीन नियम, विमान प्रवाशांना होणार मोठा फायदा; वाचा सविस्तर...

काल डेहराडूनहून दिल्लीला आली होती आणि दिल्लीहून विशाखापट्टणमला जाणारी कनेक्टिंग फ्लाइट होती. पण सर्व्हरमधील समस्येमुळे उड्डाणाला विलंब झाल्यानं फ्लाइट चुकली, यामुळे ती खूप त्रास सहन करावा लागला, अशी माहिती एका प्रवाशानं दिलीय. सॉफ्टवेअरच्या समस्यांमुळे, एअरलाइनने आता तिरुवनंतपुरम आणि पटना येथे जाणाऱ्या फ्लाइटसाठी मॅन्युअल चेक-इन सुरू केले आहे. ही मॅन्युअल चेक-इन प्रक्रिया बरीच मंदावलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com